Google Ad
Editor Choice Maharashtra

Nagpur : ‘ राज्यात रोज सरासरी सहा शेतकऱ्यांच्या आत्महत्या , सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं ‘

महाराष्ट्र 14 न्यूज : गेल्या सहा महिन्यात राज्यातील १ हजार ७४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सरासरी राज्यात रोज सहा शेतकऱ्यांची आत्महत्या होत असून महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले असल्याचा आरोप भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

राज्यातील आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तत्काळ ५० हजार कोटींच पॅकेज जाहीर करावं, अशी मागणी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
दिवसेंदिवस कोरोनाचं वाढतं संकट, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची वाढती संख्या याचीच चर्चा होत आहे. राज्यात गेल्या सहा महिन्यात तब्ब्ल १ हजार ७४ शेतकऱ्यांनी आत्महत्या झाल्या असून यावर आघाडी सरकार गप्प असल्याचा आरोप ही बावनकुळे यांनी केला.

Google Ad

मार्च महिन्यापासून मोठ्या प्रमाणात देशात कोरोनाचा फैलाव पसरण्यास सुरूवात झाली. यामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला. लॉकडाऊन असल्यामुळे यांचा सर्वाधिक जास्त फटका शेतकऱ्यांना बसला आहे. यात फळे आणि भाजीपाला शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, मालाची नासाडी होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीचे पॅकेज आणावे अशी मागणी बावनकुळे यांनी केली आहे.

Tags
Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!