Google Ad
Celebrities Editor Choice Maharashtra

बाप्पा पावला ! ई-पासमधील विघ्न दूर; पोलिसांच्या संकेतस्थळावर दिला ‘हा’ पर्याय

महाराष्ट्र 14 न्यूज : कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खूश खबर आहे. आता चाकरमान्यांच्या ई-पासमधील अडथळा दूर झाला आहे. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी पास दिलाच पाहिजे असे आदेशच सर्व पोलिसांना देण्यात आले आहेत. तसेच पोलिसांच्या संकतेस्थळावरही गणेशोत्सावासाठी ई-पासचा स्वतंत्र पर्याय देण्यात आल्याने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना तात्काळ ई-पास मिळणार असून त्यांचा कोकणात जाण्याचा प्रवास सुकर होणार आहे.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना ई-पास मिळावा म्हणून मुंबई पोलिसांनी एक परिपत्रक काढलं असून त्यात संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने चाकरमान्यांना पास देण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई पोलिसांच्या संकेतस्थळावर गणेशोत्सवाचा पर्याय देण्यात येत आहेत. सर्व पोलिस उपायुक्तांना पासला मंजुरी देण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. गणेशोत्सवासाठी ई पासला विनाविलंब मंजुरी देण्याचे निर्देश सर्व उपायुक्तांना देण्यात आले आहेत. राज्य सरकारच्या आदेशानुसार कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना प्रवासाचा पास देण्यात यावा, असे निर्देशही देण्यात आले आहेत.

Google Ad

पोलिसांच्या संकेतस्थळावरून ई-पासची परवानगी देण्यात येते. त्यामुळे साईटवरती गणेश फेस्टिव्हल असा एक नवा पर्याय देण्यात आला असून त्यामुळे चाकरमान्यांना या ऑप्शनवर जाऊन ई-पासची परवानगी घेता येणार आहे. पोलिसांच्या परिपत्रकात तसा उल्लेखही करण्यात आला आहे. चाकरमान्यांना पास देताना कोणत्याही प्रकारे उशीर होता कामा नये. ई-पास देण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता असावी, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य देण्यावर अधिक भर देण्यात यावा आणि राज्य सरकारने ई-पास देण्याबाबत ज्या मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्या सर्व सूचनांचं पालन करण्यात यावं, असे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

पोलिसांनी काढलेल्या या निर्देशामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गणेशोत्सवासाठी ई-पास मिळण्याकरिता स्वतंत्र ऑप्शन पोलिसांच्या वेबसाईटवर देण्यात आल्याने चाकरमान्यांना तात्काळ पास मिळण्याची सोय झाली आहे. त्यामुळे चाकरमान्यांना खासगी वाहतूक किंवा सार्वजनिक परिवहन सेवेद्वारे कोकणात जाता येणार आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

30 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!