Google Ad
Editor Choice Health & Fitness

माझं आरोग्य : आनंदी राहायचंय ? … मग या गोष्टी नक्की करा!

महाराष्ट्र 14 न्यूज : माझं आरोग्य – आनंदी राहायचं? मग ‘या’ गोष्टी नक्की करा!

🔴विपरीत परिस्थितीतही स्वतःला आनंदी ठेवणे ही कला. ती कला अवगत करणं जमलं कि, जगणं सुखकर बनलंच म्हणून समजा. होतं काय, आपण आनंदाचा शोध व्यक्ती, वस्तू किंवा परिस्थितीमध्ये शोधत असतो. आणि नंतर ती व्यक्ती, वस्तू किंवा परिस्थिती बदलली की आपण व्यथित, निराश किंवा हतबल होतो.

Google Ad

🔴खरं तर आपल्या मर्जीशिवाय कोणीही आपल्याला दुःखी बनवू शकत नाही. परंतु आपणच अनेकदा आपल्या आनंदाची चावी इतरांकडे सोपवून देतो. आपल्या आयुष्यातील आनंद कायम ठेवण्यासाठी पुढील काही गोष्टी नक्कीच करा…

♦ रिअॅक्ट करण्यापेक्षा रिस्पॉन्स करणे शिका.

♦भूतकाळ विसरा. भूतकाळ सोबत घेऊन चालू नका त्याने त्रासच होईल.

♦ स्वतःच्या मनात अपराधी भावना ठेवू नका. भूतकाळात झालेल्या चुका परत करायच्या नाही असा निर्धार करून पुढे चालत रहा.

♦ चांगली व वाईट वेळ येत राहील आणि जात राहील, हे सत्य स्विकारा. यामुळे तुमच्या मनाची स्थिरता टिकून राहील.

♦आनंद आणि प्रेम हा तुमचा स्वभाव आहे. तुमचा आनंद हा तुमच्या अवती-भोवती असलेल्या लोकांशी निगडीत आहे.

♦विविधतेचा स्वीकार करायला शिका. विविधता ही सहन करण्याची नव्हे, साजरी करण्याची गोष्ट आहे. सगळे विश्व एक कुटुंब आहे या भावनेने जगाकडे पाहा.

♦प्रेमाचे पुरावे मागत फिरू नका. प्रेम सिद्ध करावे लागणे हे फार कठीण काम ठरते.

♦दररोज एक नवीन मित्र बनवा. फार गंभीर राहू नका. मनसोक्त हसा आणि जीवनाचा आनंद लुटा.

♦कोणीही वाईट नसतं. काही लोक दिशा चुकतात हे लक्षात घ्या.

♦कधीही हार मानू नका. प्रयत्न सुरूच ठेवा.

♦आनंदी राहा अणि आनंद वाटा. आयुष्याचा प्रत्येक क्षण आनंदी करा, एवढंच सांगणं!

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!