Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट्स : शनिवार १० ऑक्टोबर २०२०

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज शनिवार ( दि. १० ऑक्टोबर २०२० ) रोजी ४६१ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून पिंपरी चिंचवड शहरातील ४४० रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून शहारा बाहेरील २१ रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले असून या सर्वांवर महानगरपालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर ५२९ रुग्ण हे कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

आज पिंपरी चिंचवड हद्दीमधील मृत झालेले रुग्ण हे ०३ पुरुष- चिंचवड ( ६० वर्षे ) , नवी सांगवी ( ६५ वर्षे ) , पिंपरी ( ४६ वर्षे ) ०२ स्त्री – चिंचवड ( ५५ वर्षे ) , पिंपळे गुरव ( ७५ वर्षे ) येथील रहिवामी आहेत . पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहीवाशी परंतू पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०१ पुरुष- तळेगाव दाभाडे ( ६८ वर्ष ) येथील रहिवासी आहेत.

Google Ad

माझे कुटुंब, माझी जबाबदारी सर्वेक्षण मोहिमेअंतर्गत आज अखेर १३१४ पथकांद्वारे २३४५६१९ लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात आले असुन त्यामध्ये २७२७ व्यक्तींच्या घशातील नमुन्यांची तपासणी केली असता ५८४ व्यक्ती कोवीड पॉझिटीव्ह आढळून आलेल्या आहेत .

पावसाळा असल्यामुळे वैद्यकिय विभाग , पिं.चिं.म.न.पा. मार्फत मर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी, यासाठी किमान एक तरी अतिरिक्त ( Extra ) मास्क जवळ बाळगावा .

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!