Google Ad
Editor Choice Maharashtra crimes

एकाच दिवशी दोन कुख्यात गुंडांच्या पुणे जिल्ह्यात हत्या … एकावर गोळीबार तर दुसऱ्यावर कोयत्याने वार

महाराष्ट्र 14 न्यूज (दि.१२ जुलै) : पुणे जिल्ह्यात कुख्यात गुंडांच्या हत्या झाल्याच्या दोन घटना एकाच दिवशी उघडकीस आल्या आहेत. खेड-राजगुरु नगरमध्ये राहुल उर्फ पप्पू वाडेकर या तडीपार गुंडाची हत्या करण्यात आली. गोळीबारानंतर डोक्यात दगड टाकून राहुलला संपवण्यात आलं, तर दत्तवाडी परिसरात अक्षय किरतकिर्वे या गुंडाची तीक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या करण्यात आली.

पुणे जिल्ह्यातील खेड राजगुरुनगरमध्ये पाबळ रोडवर तडीपार गुंडाची हत्या करण्यात आली. राहुल उर्फ पप्पू वाडेकर असं हत्या झालेल्या गुंडाचे नाव आहे. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास राहुलवर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला. त्यानंतर डोक्यात दगड टाकून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली.

Google Ad

पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाला असल्याचा खेड पोलिसांचा अंदाज आहे. राहुल उर्फ पप्पू वाडेकर याला चार महिन्यांपूर्वी पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते. मात्र तडिपारीचा आदेश झुगारत त्याने खेड राजगुरुनगर शहरात प्रवेश केला, त्यावेळी त्याची हत्या झाली.

दुसरीकडे, पुण्यातील दत्तवाडी परिसरात अक्षय किरतकिर्वे या गुंडाचीही हत्या करण्यात आली. चौघा जणांच्या टोळक्याने रविवारी सायंकाळी अक्षयवर कोयत्याने सपासप वार केले होते. हत्या केल्यानंतर या चौघांनीही घटनास्थळावरुन पळ काढला.

गुंड अक्षय किरतकिर्वे याच्या नावावर अनेक गुन्ह्यांची नोंद होती. त्याचीही पूर्ववैमनस्यातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या प्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यात एकामागून एक झालेल्या दोन गुंडांच्या हत्याकांडामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

11 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!