Google Ad
Editor Choice Maharashtra

Mumbai : छत्रपती संभाजी राजे म्हणाले … आमची मागणी SEBC आरक्षणाची , ओबीसीतून आरक्षणाचा प्रश्न येतोच कुठे ?

महाराष्ट्र 14 न्यूज : आज सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे प्रथमच सुनावणी होणार आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. यातून मराठा समाजातील नागरिकांना दिलासा मिळणार का? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे. दरम्यान, “आमची मागणी SEBC आरक्षणाची, ओबीसीतून आरक्षणाचा प्रश्न येतोच कुठे ” असं खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी स्पष्ट केलं. आज सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे प्रथमच सुनावणी होणार आहे. त्याबाबत संभाजीराजे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिलं.

सरकारचा बऱ्यापैकी होमवर्क यावेळी झालेला आहे. मुख्यमंत्र्यांनीही ते सांगितलं. गेल्यावेळी जे कमी पडलं होतं ते आज होणार नाही असं मला वाटतं. गरिब मराठा समाजावर अन्याय होत आहे. मी त्या 15 टक्के मराठ्यांबाबत नाही बोलत मी त्या 85 टक्के मराठा समाजाबाबत बोलत आहे जे आजही गरिब आहेत. कायद्याला बोट देऊन सर्व गोष्टी चालतात. पण जी शाहू महाराजांची भूमिका होती, त्याला लक्षात घेवून या पाच न्यायाधिशांनी निर्णय घ्यावा एवढीच माझी अपेक्षा आहे, असे संभाजीराजे म्हणाले.

Google Ad

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या स्थगितीवर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेतं याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. एसईबीसी आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती हटवण्याबाबत राज्य शासनाने केलेल्या अर्जावर आज पाच सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी होणार असल्याची अशी माहिती अशोक चव्हाण यांनी दिली होती.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

12 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!