Google Ad
Editor Choice

राष्ट्रवादीचे मिशन २०२२ : १३ऑक्टोबरच्या बैठकीबाबत आढावा बैठक, आ. बनसोडे यांच्या कार्यालयावर संपन्न!  

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ ऑक्टोबर) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांचे शहरातील नागरिक केंद्रीत प्रत्येक गोष्टीवर लक्ष असतेच शिवाय शरद पवारांनी सुध्दा पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शहरात यावे, ही मागणी करण्याकरिता आमदार अण्णा बनसोडे आणि माजी आमदार विलास लांडे यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नेते तसेच माजी नगरसेवकांच्या शिष्ठमंडळाने काही दिवसापुर्वी पवार साहेबांची भेट घेतली. सत्ताधा-यांनी केलेल्या भ्रष्टाचारासह विकासकामांच्या सर्वच मुद्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
 
पदाधिकाऱ्यांच्या  मागणीचा विचार करून 13 ऑक्टोबर रोजी पिंपरी-चिंचवड शहरात येऊन माजी नगरसेवकांची बैठक घेण्यास शरद पवार यांनी अनुमती दर्शविली आहे. तसेच, आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिशा देण्यासाठी पक्षाचा मेळावा घेण्यासही त्यांनी संम्मती दाखविली आहे.

१३ ऑक्टोबर रोजी शरद पवार यांच्या उपस्थित होणाऱ्या माजी नगरसेवकांच्या बैठकी बाबत आढावा बैठक आमदार अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयात संपन्न झाली, त्यामध्ये अनेक मुद्यावर चर्चा झाली. यात  बैठकीचे ठिकाण निवडण्याबाबत तसेच  बैठकीला सर्व  माजी नगरसेवक यांना निमंत्रण देण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.  सदर बैठकीला इतर मान्यवरांना निमंत्रण  देण्याबाबत चर्चा झाली .

Google Ad


कार्यक्रमात सर्वात प्रथम कार्यकारणी जाहीर करावी व त्यांचा यथोचीत सत्कार करावा. महिलांचा देखील समावेश असावा. प्रतिष्टीत व जेष्ठ  असणारे पक्षाला मानणारे लोकांनी पक्षाला व माजी नगरसेवकांना ताकद द्यावी.  येत्या निवडणुकीत कोण कोणत्या  मुद्द्यावर जास्त भर द्यावा लागणार , व सत्ताधार्यांना कसे घेरायचे या विषयावर चर्चा करण्यात आली .

बैठीकाला  आ.अण्णा बनसोडे, मा.आ.विलास लांडे , जेष्ठ नेते आझमभाई पानसरे , माजी नगरसेवक संघटनेचे अध्यक्ष जगदीश शेट्टी, काळूराम पवार , विजय बबन कापसे , मनोज खानोलकर , प्रसाद शेट्टी , हरेश आसवानी , तानाजी खाडे , जगनाथ साबळे, ज्ञानेश्वर  माऊली सुर्यवंशी, सनी ओव्हाळ, शामराव वाल्हेकर , राजेंद्र जगताप , पंडित रामभाऊ गवळी ,कैलास थोपटे ,अंकुश पठारे ,किरण मोटे , श्रीरंग शिंदे , धारिया राम आधार , रमा ओव्हाळ हे मान्यवर उपस्थित होते .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

8 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!