Google Ad
Editor Choice Maharashtra crimes

पुणे जिल्ह्यातील या भागात मध्यरात्री हत्येचा थरार … १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने केली आपल्या सावत्र आईची हत्या!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५जुलै) : अल्पवयीन मुलाने आपल्या सावत्र आईची हत्या केल्याचा प्रकार पुणे जिल्ह्यात उघडकीस आला आहे. धारदार कोयत्याने हल्ला करत मध्यरात्रीची मुलाने आईची हत्या केली. तळेगाव दाभाडे पोलिसांनी 17 वर्षीय अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे.

पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे भागात मध्यरात्री हत्येचा थरार घडला. 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने आपल्या सावत्र आईची हत्या केली. मुलाने धारदार कोयत्याने महिलेवर हल्ला केला होता. रेखा वाघमारे असं मयत सावत्र आईचे नाव आहे.

Google Ad

17 वर्षांचा मुलगा काहीही काम करत नाही, नुसता फिरत असतो, अशी तक्रार सावत्र आई रेखा वाघमारे सतत आपल्या पतीकडे करत असायच्या. या कारणावरुन झालेल्या वादानंतर मुलाने तिची हत्या केल्याचा आरोप आहे. हत्ये प्रकरणी अल्पवयीन मुलाला तळेगाव दाभाडे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

14 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!