Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिं.चिं.महानगरपालिकेच्या ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयात महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी घेतली पदाधिकारी, नगरसदस्य अधिका-यांसमवेत बैठक !

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १९ जुलै २०२१) : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांचे आरोग्य चांगले असेल तरच शहराच्या विकासाचा उपयोग आहे  याकरिता वैद्यकीय विभागाने लसीकरण मोहिम राबविताना दक्षता घ्यावी व सर्वांना लस मिळावी यासाठी सुयोग्य नियोजन करावे असे प्रतिपादन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले. महानगरपालिकेच्या इ क्षेत्रीय कार्यालयात महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी क्षेत्रातील पदाधिकारी, नगरसदस्य यांची स्थापत्य, विद्युत, पाणीपुरवठा, अतिक्रमण, वैद्यकीय अधिका-यांसमवेत बैठक आयोजित केली होती त्यावेळी महापौर बोलत होत्या.

यावेळी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, स्थायी समिती सभापती अॅड. नितीन लांडगे, प्रभाग अध्यक्ष विकास डोळस, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, नगरसदस्य सागर गवळी, नगरसदस्या भिमाताई फुगे, निर्मला गायकवाड, प्रियंका बारसे, सोनाली गव्हाणे, विनया तापकीर, सुवर्णा बुर्डे, क्षेत्रीय अधिकारी राजेश आगळे, कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलजा भावसार, डॉ. शिवाजी ढगे, उपअभियंता मनिष चव्हाण, लता बाबर, प्रेरणा सिनकर, संदेश खडतरे, विजय वाईकर, प्रशासन अधिकारी नाना मोरे, राजेश वाघ, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.

Google Ad

नगरसदस्यांनी मांडलेल्या समस्येमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिम राबविली जात असताना त्याचे योग्य नियोजन नसल्याने नागरिकांच्या समस्या सोडवाव्या लागतात.  यासाठी प्रत्येक नगरसदस्यांना दररोज ५० ते १०० डोसेसचे टोकन द्यावे.  दिघी येथील स्मशानभूमीमध्ये पावसाळ्यात नदीचे पाणी शिरते याबाबत स्मशानभूमी अन्यत्र स्थलांतरीत करण्यात यावी तसेच दिघीमध्ये प्रशस्त उद्यान करणे आवश्यक आहे.  स्थापत्य विषयक कामे संथगतीने चालू आहेत.  दिघीमध्ये जुन्या जकातनाक्याच्या इमारतीत महापालिकेचा छोटा दवाखाना आहे. तेथे बालकांचे लसीकरणाचे काम चालते तथापि शेजारी स्मशानभूमी असल्याने बालकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो.

दिघी आळंदी मार्गावर प्रशस्त पालखी मार्ग तयार करण्यात आलेला आहे मात्र तेथे भाजीपाला विक्रेत्यांनी रस्त्यांवर अतिक्रमण केले आहे  त्याचा पादचा-यांना त्रास होण्याबरोबरच वाहतुक कोंडी आणि अपघाताची समस्या निर्माण होत आहे.  विद्युत केबलचे अंडरग्राऊंडचे कामात दुरुस्ती करावी लागत आहे.  केबल तुटणे, विजपुरवठा खंडीत होणे यासारखे प्रकार घडत आहेत.  अनेक ठिकाणच्या रस्त्यांवर स्पीड ब्रेकरची गरज आहे.  च-होली भागात सुसज्ज रुग्णालय उभारणे गरजेचे आहे.  नाल्यामध्ये पाणी साचत असल्याने नाल्याची खोली वाढविणे, डी.पी. बॉक्स सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करणे, भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणे, ड्रेनेज समस्या, रस्तारुंदी यासारख्या सूचनांचा समावेश होता.


बैठकीत प्राप्त सूचना आणि विषयांबाबत महापौर माई ढोरे यांनी संबंधित अधिका-यांकडून आढावा घेतला.  महापौर माई ढोरे म्हणाल्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न सर्वात महत्वाचा आहे त्याला प्राथमिकता देणेत यावी,  यासाठी सर्वांचे लसीकरण करुन घ्यावे. वैद्यकीय विभागाने लसीकरण मोहिमेत सुरळितपणा आणण्यासाठी प्रयत्न करावेत, लसीकरणाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमावे. स्थानिक नागरिकांना लसीकरण करण्याबाबत प्राधान्य देण्यात यावे, लोकप्रतिनिधींच्या प्रश्नाबाबत सर्व संबंधितांनी कृती आराखडा तयार करावा.

एक महिन्यांनी पुन्हा या प्रश्नांचा आढावा घेतला जाईल असे सांगून त्यांनी रस्ते व पदपथांवरील अतिक्रमण समस्या भूमिगत केबल, डी.पी.बॉक्स जागा बदलणे, दिघी स्मशानभूमी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करणे आवश्यक त्या ठिकाणी अपघात टाळण्याकरीता स्पीड ब्रेकर बसविणे याबाबत तातडीने कार्यवाही करावी असा संबंधितांना आदेश दिला. अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी विकासकामे लवकर होण्याच्या दृष्टीने संबंधितानी प्रस्ताव सादर करावेत.  सदस्यांना त्यांनी उपस्थित केलेल्या कामाबाबत वेळोवेळी परिस्थिती नमूद करावी.  लोकप्रतिनिधी आणि प्रशासनात समन्वय ठेऊन लोकप्रतिनिधींचे प्रश्न सोडवावेत असे सांगितले. बैठकीचे प्रास्ताविक क्षेत्रीय अधिकारी ‘राजेश आगळे’ यांनी केले.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!