Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त जीवनदान देणाऱ्या डॉक्टरांचा … स्वीकृत नगरसेवक ‘अनिकेत काटे’ यांच्या वतीने सत्कार !

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१जुलै) : डॉक्टर्स जीवनदान देतात. त्यामुळेच त्यांना मानवरुपी देव मानले जाते. डॉक्टरांप्रती सजामामध्ये नितांत आदर आहे. कोरोना व्हायरस संकट काळात तर डॉक्टरांचे महत्त्व अधोरेखित झाले. डॉक्टरांनी देखील जीवाची बाजी लावून या लढ्यात काम केले. त्यामुळे त्यांचे आभार मानावे तितके थोडेच. अशाच या डॉक्टरांसाठी एक दिवस समर्पित करण्यात आला आहे. तो म्हणजे डॉक्टर्स डे. दरवर्षी डॉक्टरांच्या सन्मानार्थ १ जुलै दिवशी नॅशनल डॉक्टर्स डे साजरा केला जातो. भारतामधील प्रसिद्ध डॉक्टर डॉ. बिधान चंद्र रॉय यांच्या सन्मानार्थ आणि त्यांना श्रद्दांजली म्हणून त्यांच्या जयंती आणि पुण्यतिथी म्हणजे १ जुलै दिवशी नॅशनल डॉक्टर्स डे साजरा केला जातो.

आज ०१ जुलै रोजी जागतिक ‘डॉक्टर डे’ दिनानिमित्त अनिकेतदादा राजेंद्र काटे स्वीकॄत नगरसेवक पिं.चिं.मनपा व जेष्ठ नागरिक संघ दापोडी यांच्या वतीने दापोडी येथील जेष्ठ नागरिक संघ कार्यालय या ठिकाणी दापोडी सांगवी परिसरातील आरोग्य विभागामध्ये अहोरात्र केलेल्या कार्याबद्दल डॉक्टरांचा तुळशीचे वॄक्ष व पीपीई किट देवून सत्कार करण्यात आला.

Google Ad

नॅशलन डॉक्टर्स डे च्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी देशभरातील डॉक्टर्संना संबोधित करणार आहेत. देशभरातील कोरोनाचे संक्रमण लक्षात घेता या काळात डॉक्टर्सनी चांगलं काम केलं आहे. आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांनी या काळात अविरतपणे काम केल्याने देशभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

62 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!