Google Ad
Editor Choice Education

कोरोनाच्या संभाव्य तिस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर शहरातील लहान मुलांसाठी चाईल्ड हेल्पलाईन सुरु

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०५जुलै) : कोरोनाच्या संभाव्य तिस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर शहरातील लहान मुलांसाठी चाईल्ड हेल्पलाईन सुरु आली असून त्याचे उद्घाटन आज उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते आज ऑनलाईन संपन्न झाले.

कोरोनाच्या संभाव्य तिस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर शहरातील लहान मुलांसाठी चाईल्ड हेल्पलाईन सुरु करण्यात येणार असून हेल्पलाईन चालविणा-या शालेय विद्यार्थ्यांना तीन दिवसीय प्रशिक्षण शिबीर घेऊन प्रशिक्षण देण्यात आले आहे.

Google Ad

याप्रसंगी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, अभिनेत्री प्राजक्ता माळी, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते राजू मिसळ, आयुक्त राजेश पाटील, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, महिला व बालकल्याण समिती सभापती चंदा लोखंडे, नगरसेवक तुषार कामठे, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

काही महिन्यापूर्वी आपण स्वत : कोरोना बाधित होतो , त्यावेळी आलेले अनुभव आणि माहिती अभावी आलेल्या अडचणी सिनेअभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी विशद केल्या . त्या म्हणाल्या , महापालिकेच्या मी जबाबदार अॅपमध्ये कोरोना संदर्भात विविध माहिती समाविष्ट असून बेड मॅनेजमेंटसह विविध हेल्पलाईन आणि इतर माहिती उपलब्ध असल्याने हा अॅप अधिकाधिक नागरिकांनी डाऊनलोड करावा असे आवाहन त्यांनी केले . कोरोनाबाबत गाफील न राहता सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असेही त्या म्हणाल्या . चाईल्ड हेल्पलाईनचे संचालन करणा – या विद्यार्थ्यांशी देखील प्राजक्ता माळी यांनी ऑनलाईन संवाद साधला .

कोरोना विषयक जागृतीसह आरोग्य विषयक , सामाजिक , शाळेविषयी , खेळाविषयी मुलांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा आणि संवाद साधण्याचा प्रयत्न चाईल्ड हेल्पलाईन द्वारे करण्यात येणार आहे . या हेल्पलाईन द्वारे मुलांच्या प्रश्नांना मुलेच उत्तर देणार आहे . यामध्ये एच ए स्कूल , गेंदीबाई चोपडा शाळा , अण्णासाहेब मगर शाळा , ज्ञान प्रबोधिनी शाळा , सिटी प्राइड स्कूल , थेरगाव माध्यमिक विद्यालय , छत्रपती शिवाजी राजे विद्यालय , पिंपळे गुरव शाळा अशा शाळांमधील सातवी ते दहावीचे विद्यार्थी व त्यांचे शिक्षक सहभागी होत आहेत . तसेच महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी व मुलांचे पालक यांचे देखील यामध्ये सहकार्य राहणार आहे .

कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांचे आभार आयुक्त राजेश पाटील यांनी मानले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

13 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!