Google Ad
Editor Choice

कोकण विकास महासंघाकडून पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूं व आर्थिक साहाय्य …

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ ऑगस्ट) : मागील पंधरा दिवसात कोकण भागात रत्नागिरी, महाड, खेड, चिपळूण परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक गावात, वाडी – वस्तींवर पडझड होऊन येथिल नागरीकांची घरे उध्वस्त झाली आहेत. हजारो कुटूंबियांचा संसार उध्वस्त झाला आहे. या पुरग्रस्त कुटूंबियांना पिंपरी चिंचवड शहरातील नागरीकांनी मदतीचा हात द्यावा असे आवाहन कोकण विकास महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केले होते.

शहरातील बहुतांशी नागरीकांनी डॉ. कैलास कदम यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अवघ्या पाच दिवसात हजारो रुपयांचा निधी जमा झाला. या जमलेल्या निधीतून जीवनावश्यक वस्तूंचे सुमारे 450 किट करण्यात आले. उर्वरित रोख रक्कमेतून काही कुटूंबियांना कोकण विकास महासंघाच्या पदाधिका-यांच्या हस्ते रोख अर्थसहाय्य करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हे सर्व साहित्य घेऊन शुक्रवारी रात्री चार टेंम्पोसह महासंघाचे निवडक पदाधिकारी चिपळूण, रायगड, महाड, खेड मधिल पुरग्रस्त भागात रवाना झाले आहेत.

Google Ad

या मदत पथकात मा नगरसेवक सद्‌गुरु कदम,कॅ.श्रीपत कदम, अशोक कदम, विजय आंब्रे, अनिल मोरे, राजेश दळवी, संजय उत्तेकर, राजेंद्र सोंडकर, अनंत साळवी, ज्ञानेश्वर पवार, अमृत जाधव, प्रा. गणेश गोरीवले, रुपेश मोरे, अरुण यादव, अवधूत कदम, कृष्णा यादव, आदींचा समावेश आहे. या किटमध्ये दोन ब्लॅंकेट, दोन टॉवेल, दोन साड्या, दोन परकर, दोन टी-शर्ट, दोन बरमूडा, गाऊन, दोन चप्पल जोड, वाफेची मशिन, सॅनिटायझर व पाच मास्क याचा समावेश आहे. शुक्रवारी महाड, साखर – सुतारवाडी, पोलादपूर, पोसरे, धामनंद, कलबस्ते-चिपळूण, बिरमणी, आंबडस, सोलकर वाडी, आंबवली – बाऊल वाडी, धनगर वाडी, चाटव या गावांमध्ये साहित्यांचे किट व बावीस कुटूंबियांना रोख अर्थसहाय्य कोकण विकास महासंघाकडून करण्यात आले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

5 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!