Google Ad
Editor Choice

जगदंब व कै बबनराव भाऊसाहेब कदम प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक बांधिलकीतून पिंपळे गुरव मधील ३० कुटूंबियांना मदतीचा हात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१८मे) : शहरात कोरोनाच्या संसर्गाचा हाहाकार माजला आहे. मागील वर्षी लॉकडाऊनमध्ये अनेक जणांवर उपासमारीची वेळ आली होती. त्यामुळे अनेक जणांनी आपल्या गावाकडे पळ काढला होता. उपासमारीमुळे अनेकांचे प्राणही गेले होते. हीच परिस्थिती लक्षात घेत पिंपळे गुरव येथील जगदंब प्रतिष्ठान, कै. बबनराव भाऊसाहेब कदम प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमातून एक सामाजिक बांधिलकी जपत परिसरातील ३० गरजू कुटुंबांना अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले.

याप्रसंगी लक्ष्मण नागरी पतसंस्था उपाध्यक्ष सुनील कदम, विलास कदम, डॉ. एम. एस. पुजारी, उद्योजक कुंदन कदम, प्रणिकेत कदम, आदेश कदम, उमेश भालेकर, सनी कदम, मंगेश फडके, प्रकाश लोंढे, प्रणिकेत चौधरी, स्वप्नील कदम, प्रवीण कदम, गणेश कदम, माऊली कदम, योगेश कदम, प्रवीण चव्हाण, विशाल काशीद, रमेश मुठे, राकेश शिर्के, मारुती हिराळे, बाळू एकशिंगे, मशाक कोडी आदी मान्यवर उपस्थित होते.

Google Ad

यावेळी कुंदन कदम यांनी सांगितले सर्व सामान्य नागरिकांवर लॉकडाऊनच्या काळात उपासमारीची वेळ येऊ नये. अशा संकट समयी एक हात मदतीचा पुढे करत सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करत आहोत. यापुढेही गरजूंना मदत करत राहणार आहे. यावेळी प्रशासनाचे सर्व नियम पाळत, फिजिकल डिस्टन्सिंगचा वापर करून हा कार्यक्रम पार पाडण्यात आला.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!