Google Ad
Editor Choice Education

‘देवांग कोष्टी समाज’ च्या वतीने विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेचा शुभारंभ

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ सप्टेंबर) : देवांग कोष्टी समाज पुणे , यांच्या वतीने पिंपळे निलख येथे श्री चौंडेश्वरी देवी मंदिरात समाजबांधवांच्या वतीने घटस्थापना करण्यात आली . यावेळी समाजातील अनेक मान्यवर महिला मंडळी व कार्यकारणी उपस्थित होती . यावेळी घटस्थापनेचे औचित्य साधत विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेचा शुभारंभ करण्यात आला .

या योजनेमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते त्यांना शिष्यवृत्तीचे वाटप रोख रक्कम रूपये १००० / – देऊन सुरू करण्यात आली . सदरची शिष्यवृत्ती ही प्रत्येक महिन्याला रूपये १००० / – प्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याला वाटप करण्यात येणार आहे व ही शिष्यवृत्ती शैक्षणिक वर्ष अखेरपर्यंत चालू राहणार आहे .

Google Ad

या उपक्रमासाठी समाज बांधवांकडून चांगला प्रतिसाद मिळाला . या कार्यक्रमासाठी सर्व कार्यकारिणी , अध्यक्ष महोदय तसेच समाजातील महिला व बंधू – भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते . कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला . यावेळी सर्व पदाधिकारी कार्यकारणी सदस्य सल्लागार सुरेश तावरे, सुनील ढगे, दत्ता ढगे, अशोक भुते, सुनील डहाके, सतीश लिपारे, ऍडवोकेट डोईफोडे, राजन बोंदार्डे, राजेंद्र चोथे आदि उपस्थित होते.

आपणही असे काही तरी करू या’ … माणूस म्हणून जगू या !

▶️’देवांग कोष्टी समाज ‘ पुणे यांचा सामाजिक बांधिलकी जोपासत ..अनोखे उपक्रम :-

बालगृहातील ४५ अनाथ निराधार मुलांना सहलीचे निमित्ताने देवदर्शन घडवले. मंचर – भिमाशंकर रोड वरील पळसठीका ( घोडेगाव ) येथील .. बालगृह अनाथ निराधार मुलांचे संगोपण केंन्द्र येथील बालकांना देवांग कोष्टी समाज पुणे यांच्या वतीने सहलीचे करण्यात आले होते .

तसेच देशाच्या ७५ व्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी प. पू. अण्णासाहेब मोरे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून देवांग कोष्टी समाज पुणे मोफत आरोग्य तपासणी, नाडी परीक्षा शिबीर आयोजीत करण्यात आले होते.

कोष्टी समाज बांधवांचा भव्य स्नेह मेळावा पिंपळे गुरव येथील निळू फुले नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी कै. सौ अलकाताई मुसळे यांचे स्मरणार्थ संगीत रजनी 2022 चे आयोजन करण्यात आले होते.

देवांग कोष्टी समाज पुणे आयोजीत वधु वर परिचय ऑनलाईन महामेळावा शनिवार दिनांक 25 डिसेंबर 2021 रोजी श्री चौंडेश्वरी मंदिर, पिंपळे निलख, पुणे येथे मोजक्या निमंत्रितांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता.

शेकडो साधक यांच्याकरिता देवांग कोष्टी हॉस्टेल निलख येथे ध्यान योग वर ध्यान रत्न श्री पी व्ही.रामा राजू जी यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!