Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

दापोडी रेल्वे स्टेशन मधील सर्व्हर रूमला आग … रेल्वे सेवेवर परिणाम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मार्च) : पिंपरी चिंचवड शहरातील दापोडी रेल्वे स्टेशन ऑटोमॅटिक इलेक्ट्रिक सर्व्हर रूमला आग लागली . पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या दोन बंबांनी आग विझवली . मात्र , रेल्वे वाहतूकीवर याचा परिणाम झाला आहे . आगीच्या घटनेमुळे नांदेड पनवेल एक्सप्रेसला एक तास उशिर झाला . दापोडीत नांदेड एक्स्प्रेस सिग्नल अभावी अडकून पडली होती

. स्टेशनच्या मागील बाजूस वाहतूकदिवे नियंत्रण रिले रूमला आग लागल्याने दापोडी ते पिंपरी मार्गावरिल सर्व सिग्नल यंत्रणा बंद पडली होती . स्थानिक नागरिक रहिवाशी यांनी तात्काळ अग्निशामक दलाला कळवून पाचारण करण्यात आले . यामुळे लोकल वाहतूकीवर ही याचा परिणाम होणार आहे . यावेळी पुणे विभागीय रेल्वे बोर्ड सदस्य विशाल वाळुंजकर घटनास्थळी उपस्थित होते . रेल्वे कडून युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे.

Google Ad

या घटनेमुळे दोन पुणे लोणावळा लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या . तर सिग्नल अभावी ईतर गाड्यांना उशीर झाला . दापोडी ते पिंपरी मार्गावरील सिग्नल दिवे बंद पडले आहेत . रेल्वेच्या रेणु शर्मा मुख्य विभागीय व्यवस्थापक व रेल्वे अधिकारी मिलिंद वाघोलिकर , शाम कुलकर्णी डीसीआरएम यांनी घटनास्थळी भेट देत चौकशी करत पाहणी केली . आगीचे कारण शोधण्यासाठी समिती तर्फे चौकशी समिती नेमण्यात आली असल्याचे अधिका – यांना डून सांगण्यात आले . तर दुरुस्तीचे काम सुरू आहे . लवकरात लवकर पूर्ववत व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे रेल्वे अधिका – यांकडून सांगण्यात आले .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement