Google Ad
Editor Choice

रविवारपासून नियमित धावणार ‘पुणे मेट्रो’, ‘या’ तिकीट दरात पिंपरी चिंचवडकर आणि पुणेकरांना अनुभवता येणार मेट्रोचा सुखद प्रवास

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०५ मार्च) : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी (दि.०६) पुणे दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या हस्ते पुणे मेट्रोचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटन झाल्यानंतर त्याच दिवसांपासून लगेच पिंपरी – चिंचवड ते फुगेवाडी व वनाज ते गरवारे हे दोन मार्ग व्यावसायिक तत्त्वावर सुरु करण्यात येणार आहेत. या मार्गावरील कमीत कमी तिकीट १० रुपये व जास्तीत जास्त २० असेल. तसेच परतीचे तिकीट पाहिजे असेल तर त्यासाठी ३० रुपये शुल्क द्यावे लागेल. दोन्ही ठिकाणी एकच दर असणार आहेत.

पुणे मेट्रो सकाळी ०७ वाजता सुरु होईल आणि रात्री ०९ वाजता थांबेल. प्रत्येक मार्गावर २७ फेऱ्या होणार आहेत. ज्यांचे १०० तासांचे मेट्रो ड्रायव्हिंग पूर्ण झाले आहे, असे प्रशिक्षित चालक दोन्ही मेट्रोला असणार आहेत. त्यांना ०८ तासांची ड्युटी आहे. ताशी ८० किमी या वेगाने प्रवाशांना नेण्याची महामेट्रोला रेल्वे सुरक्षा व दक्षता आयुक्तांची परवानगी मिळाली आहे. प्रत्येक स्थानकात मेट्रो २० व गर्दीच्या ठिकाणी ३० सेकंद थांबेल. मेट्रोचे दरवाजे आपोआप बंद होणारे असून दरवाजे बंद झाल्याशिवाय मेट्रो धावणार नाही.

Google Ad

▶️प्रवाशांसाठी हेल्पिंग पॉईंट
सुरुवातीच्या काही दिवसांसाठी महामेट्रो प्रत्येक स्थानकात प्रवाशांकरता एक हेल्पिंग पॉईंट करणार आहे. तसेच प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी स्थानकात व डब्यातही एक कर्मचारी असणार आहे. तिकीट कुठे काढायचे, दोन मजली स्थानकात केव्हा, कुठे आणि कसे जायचे याबाबत हे कर्मचारी प्रवाशांना मार्गदर्शन करतील.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!