Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

दिलासादायक : पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाच्या रुग्ण संख्येत घट … मृत्यूचे प्रमाण देखील झाले कमी!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज रविवार ( दि. २७, डिसेंबर २०२० ) रोजी पिंपरी चिंचवड शहरातील ९४ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून या सर्वांवर पिंपरी चिंचवड मनपा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर १०४ रुग्ण हे कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहेत. शहरात रुग्णांची संख्या घटत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी झाले आहे.

गेल्या २४ तासामध्ये शहरात ८ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील ५ तर हद्दीबाहेरील ३ रुग्णांचा समावेश आहे. आज मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये पिंपरी, भोसरी, तळवडे, दिघी, तळेगाव दाभाडे, चाकण, जुन्नर येथील रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत शहरात २४७० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून यामध्ये १७५० शहरातील तर ७२० पालिका हद्दी बाहेरील आहेत. सध्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये ७६६ रुग्ण अ‍ॅक्टिव् असून त्यांच्यावर शहरातील कोव्हिड केअर सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत. पिंपरी महापालीका हद्दीबाहेरील ९५ रुग्णांवर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर पिंपरी चिंचवडमधील ७१ रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Google Ad

 

Google Ad

About the author

Maharashtra14 News

7 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!