Google Ad
Editor Choice Education

आरटीई 25 टक्के ऑनलाईन लॉटरीव्दारे निवड झालेल्या यादीतील विदयार्थ्यांचे प्रवेशाबाबत या आहेत सूचना

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१०जून) : राज्य शासनाने बालकांचा मोफत व सक्तीचे शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 चे कलम 12 ( 1 ) ( सी ) नुसार खाजगी विना अनुदानित / कायम विना अनुदानित / स्वयंअर्थसहाय्यिक शाळांमध्ये प्रवेश स्तरावर 25 टक्के जागा वंचित व दुर्बल घटकांतील बालकांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे . त्यानुसार शासन निर्णय व मा . प्राथमिक शिक्षण संचालनालय , महाराष्ट्र शासन , पुणे यांचे संदर्भिय पत्रातील तरतूदीनुसार पुणे जिल्हा अंतर्गत शैक्षणिक वर्ष सन 2021-2022 या वर्षासाठी पुणे जिल्हयामध्ये आरटीई अंतर्गत 25 टक्के प्रवेशातंर्गत 985 शाळांनी 14773 जागा असून 55813 अर्ज ऑनलाईन नोंदणीव्दारे भरलेले आहे .

सदर अर्जातून 14867 विदयार्थ्याची ऑनलाईन लॉटरीव्दारे निवड झालेली आहे . तरी निवड झालेल्या यादीतील विदयार्थ्यांचे प्रवेशाबाबत मा . शिक्षण संचालक ( प्राथमिक ) , महाराष्ट्र शासन पुणे . यांनी काही सूचना केल्या आहेत.

Google Ad

▶️अशा आहेत सूचना :-

1) सन 2021-22 या वर्षाची आरटीई 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया दि .11 / 06 / 2021 पासून सुरू करण्यात यावी , जिल्हयातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे .
2) निवडयादीतील विदयार्थ्यांना प्रवेशाकरीता 20 दिवसांचा कालावधी देण्यात यावा ,
3) कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता पालकांनी शाळेत गर्दी करू नये . शाळांनी त्यांना आरटीई पोर्टलवर जी यादी प्राप्त झाली आहे . त्या यादीतील पात्र विदयार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठीचा दिनांक आरटीई पोर्टलवर दयावा .

4) ज्या बालकांना लॉटरी लागली आहे त्यांच्या पालकांनी मुळ कागदपत्रे व छायांकित प्रती घेऊन शाळेत जाऊन आपल्या पाल्याचा तात्पुरता प्रवेश ( Provisional Admission ) निश्चित करावा . बरेच पालक शाळेत प्रवेश मिळावा यासाठी आरटीई प्रवेश फॉर्म भरताना चुकीचे अंतर दाखवतात त्यामुळे रहिवासी पत्याचा पुरावा ( Adress Proof ) इ . कागदपत्रांवरून शाळा व निवासी पत्त्याच्या अंतराची पडताळणी करावी , निवड यादीतील बालकांबाबत चुकीचे अंतर दाखविल्याचे निदर्शनास आल्यास शाळेने तात्पुरता प्रवेश देवू नये . अशा पालकांनी तालुकास्तरीय समिती / शिक्षणाधिकारी यांचेकडे अर्ज करावा . संबंधित पडताळणी समितीने आलेले अर्ज व तक्रारीची शाहनिशा करून प्रतिक्षा यादीतील बालकांचे प्रवेश सुरू होण्याआधी प्रवेश दयावा किंवा देवू नये , याबाबतचा आदेश शाळेला दयावा . सदरील आदेशाप्रमाणे शाळेन कार्यवाही करावी .

5) शुक्रवार , दिनांक 11 जून , 2021 पासून शाळांनी पालकांना प्रवेशाकरिता पोर्टलवर दिनांक दयाव्या आणि आरटीई 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची कार्यवाही सुरू करावी . आरटीई 25 टक्के ऑनलाईन प्रवेश सुरू झाले आहेत अशा सूचना शाळेच्या प्रवेशाव्दारावर लावाव्यात .
6) कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व लॉकडाऊन या कारणांमुळे जे पालक प्रत्यक्षरित्या शाळेत प्रवेशासाठी येऊ शकत नाही अशा बालकांच्या पालकांनी विहित मुदतीत दूरध्वनीव्दारे , ई – मेलव्दारे , व्हॉटसअॅपवदारे शाळेत संपर्क करून प्रवेशाची कार्यवाही पूर्ण करावी .

7) निवड यादीतील विदयार्थ्यांच्या प्रवेश घेण्याचा कालावधी संपल्यानंतर शाळांमधील रिक्त जागांवर प्रतिक्षा यादी मधील विदयार्थ्यांना अनुक्रमे प्राधान्य देण्यात येईल . त्याबाबतच्या सविस्तर सूचना आरटीई पोर्टलवर दिल्या जातील .
8) सन 2021-2022 या वर्षाची आरटीई 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे . हे पालकांना समजण्यासाठी आपल्या स्तरावरून मोफत प्रसिध्दी दयावी .
9) कागदपत्र पडताळणी समितीने शाळेच्या मुख्याध्यापकांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत लेखी स्वरूपात सूचना निर्गमित कराव्यात.

असे ज्योत्स्ना शिंदे प्रशासन अधिकारी पिंपरी चिंचवड मनपा यांनी कळविले आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

68 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement