Google Ad
Editor Choice

दापोडीत नरवीर तानाजी व्यायाम मंडळ व शौर्य प्रतिष्ठान कडून मूर्ती व शस्त्र पूजन करत अभिवादन!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ फेब्रुवारी) : स्वराज्याचे सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांच्या शौर्य दिवस (पुण्यतिथी) निमित्त दापोडी मध्ये इतिहासकार शिवव्याख्याते प्रा.रवींद्र जगदाळेसर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये पुष्पहार यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला.

तसेच यावेळी नगरसेविका माई काटे, माजी नगरसेविका चंद्रकांताताई सोनकांबळे स्वीकृत सदस्य अनिकेत काटे,स्वीकृत नगरसेवक संजय कणसे ,मंडळाचे अध्यक्ष शंकर जम, युवा नेते संदीप गायकवाड,रेल्वे समिती सदस्य विशाल वाळुंजकर, सिकंदर सूर्यवंशी नवनाथ डांगे ,सौ.अस्मिता कांबळे ,नितीन शिंदे, रवींद्र कांबळे, अहमद शेख ,संजय जम यांच्या शुभहस्ते शस्त्र पूजन करण्यात आले….!

Google Ad

यावेळी शिवव्याख्याते इतिहासकार प्रा. रवींद्र जगदाळेसर, यांनी नरवीर तानाजी मालुसरे यांचा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराज असणारे मावळ्यांची निष्ठा, स्वराज्याची संकल्पना ते स्वराज्यातील मावळ्यांचे योगदान तसेच येणाऱ्या नव्या पिढीला इतिहासची माहिती होण्याच्या दृष्टीने उपक्रम घेण्याची आवश्यकता असून महिलांनी मर्दानी खेळ दान पट्टा लाटीकाटी खेळ शिकण्याची आवश्यकता आपल्या व्याख्यानातून व्यक्त केली…!

राजूभाऊ नलावडे, विजय जम, अजय जम, दत्ता चक्रनारायण, विशाल घुमे ,गणेश आटोळे, राजेंद्र बोंबले, प्रमिलाताई घुमे, दिपाली जम, हिरा बोंबले, दीक्षा वाळुंजकर, युवराज वाळुंजकर ,राजू कानडे, उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशाल वाळुंजकर ,सूत्रसंचालन राजू नलावडे यांनी तर आभार गणेश आटोळे यांनी केले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!