Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

क्रांतीवीरांना क्रांतिदिनानिमित्ताने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महापौर माई ढोरे यांनी केले अभिवादन!

महाराष्ट्र 14 न्यूज, ० ९ ऑगस्ट : भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आपल्या प्राणांची आहूती देणा – या क्रांतिवीरांना क्रांतीदिनानिमित्त चिंचवडगाव येथील हुतात्मा चापेकर बंधूच्या पुतळयास , चिंचवड स्टेशन येथील क्रांतिवीर लहूजी वस्ताद साळवे व क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके तसेच दापोडी येथील शहिद भगतसिंग व हुतात्मा नारायण दाभाडे यांच्या पुतळ्यास पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले .

चिंचवडगांव येथे झालेल्या कार्यक्रमास उपमहापौर तुषार हिंगे , सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके , नगरसदस्य सुरेश भोईर , प्रशासन अधिकारी प्रभावती गाडेकर , कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे , माहिती व जनसंपर्कचे प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते . चिंचवड स्टेशन येथील क्रांतिवीर लहूजी वस्ताद साळवे व क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके येथे झालेल्या कार्यक्रमास उपमहापौर तुषार हिंगे , सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके , सहाय्यक आरोग्य अधिकारी एम.एम. शिंदे , माहिती व जनसंपर्कचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते .

Google Ad

दापोडी येथील शहीद भगतसिंग व हुतात्मा नारायण दाभाडे येथे झालेल्या कार्यक्रमास उपमहापौर तुषार हिंगे , सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके , नगरसदस्य राजू बनसोडे , माहिती व जनसंपर्कचे प्रफुल्ल पुराणिक , हुतात्मा नारायण दाभाडे यांचे नातू धनंजय दाभाडे , सुरेश दाभाडे , सरोज दाभाडे , नाना वानखेडे , राजेंद्र , सुर्यकांत खोल्लम आदी उपस्थित होते .

 

Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

28 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!