Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

७ जून ते १३ जून पिंपरी युवासेनेच्या वतीने … पिंपरी चिंचवड शहरात आदित्य जनसेवा साप्ताहाचे आयोजन … निलेश हाके करतायेत गरजूंना मदत!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.११जून) : महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री मा. आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ७ जून ते १३ जून पिंपरी युवासेनेच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात आदित्य जनसेवा साप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. 

पिंपरी युवासेनेकडून आदित्य जनसेवा सप्ताह चे उद्घाटन दापोडी येथील सरवस्ती अनाथ आश्रमास अन्नधान्य वाटप करून शिवसेना शहर प्रमुख व नगरसेवक सचिन भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक राजू बनसोडे, पिंपरी युवतीसेना प्रतीक्षा घुले, विभागप्रमुख राजू सोलापुरे, मैत्री ग्रुप चे रवीभाऊ कांबळे,ओंकार जगदाळे,अंकुशमामा जाधव, अक्षय गायकवाड, राहुल जाधव उपस्थित होते.

Google Ad

▶️कासरवाडीतील सफाई कर्मचाऱ्यांना मास्क,सॅनिटायझर व हॅन्डग्लोझ वाटप
आदित्य जनसेवा सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी कोरोना काळात आपल्या जिवाची पर्वा न करता अविरत सेवा करनार्या कासरवाडी येथील सफाई कर्मचार्यांना त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मास्क,सॅनिटायझर व हॅन्डग्लोझचे वाटप करण्यात आले. यावेळी समाजसेविका शीलामामी जाधव, आरोग्य अधिकारी धनश्री जगदाळे, रवी नगरकर, संजय पिंपळे उपस्थित होते.

▶️यशवंतराव चव्हाण रूग्णालयात रूग्णांना फळवाटप
आदित्य जनसेवा सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी यशवंतराव चव्हाण रूग्णालयात उपचार सुरू असलेल्या रूग्णांना सामाजिक बांधिलकी जपत फळवाटप करण्यात आले. यावेळी अभिषेक कांबळे ,रवी नगरकर, सुनील दांगडे, अक्षय शिंदे, ओंकार जगदाळे उपस्थित होते.

▶️युवासेनेतर्फे गरजू नागरिकांना शिधावाटप
आदित्य जनसेवा सप्ताहाच्या चौथ्या दिवशी कोरोना काळात लांडेवाडी मधील कष्टकरी गोरगरीब, हातमजूर, मोलमजुरी करणाऱ्या जनतेची परवड पाहता युवासेनेतर्फे शिधावाटप शिवसेना विभाग प्रमुख गणेश रोकडे, उपविभाग प्रमुख प्रमोद गायकवाड, गणेश जाधव, अभिषेक कांबळे, युवासेना चे सनी चव्हाण, अशोक जगदाळे ह्यांच्या हस्ते करण्यात आले.सदर कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी विभागसंघटक निलेश हाके व ओंकार जगदाळे ह्यांनी केले होते. हे कार्यक्रम रविवार १३ जून पर्यंत सुरु राहणार असून या साप्ताहिक कार्यक्रमांचे आयोजन पिंपरी विभागसंघटक निलेश हाके यांनी केले आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

5 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!