Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड मनपा प्रशासनाकडून कर्मचा – यांवर जबरदस्तीने लादण्यात येणा – या खाजगी विमा पॉलीसीला कर्मचारी महासंघाचा एकमताने विरोध

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाची धन्वंतरी स्वास्थ योजना चालू ठेवणेबाबत सर्व कर्मचा – यांसाठी गेट मिटींग आज दिनांक ३०/१२/२०२० रोजी दुपारी १ वाजता पिंपरी चिंचवड महानगरपालिका मुख्य कार्यालय येथे आयोजित करणेत आली होती . सदर मिटींग मध्ये महानगरपालिका प्रशासनाकडून कर्मचा – यांवर जबरदस्तीने लादण्यात येणा – या खाजगी विमा पॉलीसीला एकमताने विरोध दर्शविण्यात आला .

धन्वंतरी स्वास्थ योजना कर्मचा – यांसाठी कशा प्रकारे अत्यंत फायदेशीर व ख – या अर्थाने कर्मचा – यांच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे . याबाबतचे सविस्तर मार्गदर्शन कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष श्री . अंबर चिंचवडे यांनी केले . सदर गेट मिटींगच्या वेळी महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते श्री . राजु मिसाळ व शिवसेना गटनेते श्री . राहूल कलाटे , मनसे गटनेते श्री . सचिन चिखले , नगरसदस्य श्री.पंकज भालेकर , श्री . सचिन चिंचवडे , श्री . राजू बनसोडे , श्री . तुषार कामठे व नगरसदस्या सौ . सुलक्षणा धर यांनी धन्वंतरी योजना चालू ठेवणेबाबत पाठिंबा दिला .

Google Ad

या वेळी कर्मचा – यांसाठी वरदायीनी असलेली धन्वंतरी स्वास्थ योजना बंद करून त्या ऐवजी खाजगी विमा पॉलिसी प्रशासनाने लागू केल्यास त्याविरूद्ध कर्मचारी महासंघाच्या वतीने अविरत लढा दिला जाईल तसेच यापुढे आंदोलन अधिक तीव्र करून प्रसंगी काम बंद आंदोलन करण्याची भूमिका देखील घेतली जाईल अशा प्रकारचे आवाहन कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष श्री अंबर चिंचवडे यांच्या वतीने प्रशासनाला करणेत आले . या वेळी सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री . शिवाजी तापकीर , सेक्रेटरी श्री . डी.डी. फुगे , माध्यमिक व प्राथमिक शिक्षक संघटनेचे कर्यरत व सेवानिवृत्त पदाधिकारी तसेच कर्मचारी महासंघाचे सर्व पदाधिकारी , महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते .

Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

162 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!