Google Ad
Editor Choice Pune

Pune : पुण्यात तिसरी महापालिका करण्यास आमचा विरोध नाही … खासदार गिरीश बापट यांनी दिले तिसऱ्या महापालिकेचे संकेत!

महाराष्ट्र 14 न्यूज :  पुण्यात तिसरी महापालिका अस्तित्वास येण्यास खासदार गिरीश बापट यांनी सकारात्मक संकेत दिलेत. पुण्यात तिसरी महापालिका करण्यास आमचा विरोध नाही, याबाबतचा आमचा सर्व्हे सुरू आहे, असं स्पष्टीकरण पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी दिलं. गिरीश बापट यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

23 गावे पुणे महापालिकेत समावेश करून घेण्यास राज्य सरकारचा मदतीचा हात आखडता घेत आहे. खरं तर 23 गावे पुणे महापालिकेत आली असून, याकरिता पुणे महापालिकेला राज्य सरकारने मदत केली नाही. पीएमपीएलला केंद्र सरकारच्या माध्यमातून 150 ई-बसेस मिळणार आहेत. पण तिसरी महापालिका करायची झाल्यास तिची हद्द, लोकसंख्या, एकूण जागा याबाबत चर्चा होणे गरजेचे असून, याकरिता आमचा सर्व्हे सुरू आहे, असं गिरीश बापट यांनी सांगितले.

Google Ad

Google Ad

About the author

Maharashtra14 News

4 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!