Google Ad
Editor Choice

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या चिंचवड मतदार संघातील वारंवार महावितरण मार्फत विजेचा होणारा लपंडाव थांबणार … दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर पाठपुराव्याला अखेर यश

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२४ ऑगस्ट) : चिंचवड मतदार संघातील वारंवार महावितरण मार्फत विजेचा होणारा लपंडाव थांबणार असून आमदार लक्ष्मण जगताप यांनी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून दोन कोटी रुपयांचा निधी या कामांकरिता मंजूर करण्यात आला आहे.

चिंचवड विधानसभा मतदार संघातील वाढती वीज ग्राहकांची संख्या लक्षात घेता नवीन रोहित्र ( ट्रान्सफॉर्मर ) बसविणे , धोकादायक ट्रांसफार्मर सुरक्षित ठिकाणी हलविणे , कमी दाबाच्या लो व्होल्टेज एरिया ठिकाणी नवीन केबल टाकने व नवीन ट्रान्सफॉर्मर बसविणे , धोकादायक पोल सरकविणे तसेच ओवर हेड वायरिंग भूमिगत करणे इत्यादी कामाकरिता दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे . लक्ष्मण पांडुरंग जगताप आमदार चिंचवड विधानसभा यांनी याबाबत ही माहिती दिली.

Google Ad

पिंपरी चिंचवड शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे विजेची मागणी वाढत असून त्या प्रमाणात ग्राहकांना सुविधा मिळाव्यात यासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या कार्यालयात चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांच्या वतीने कामकाजाविषयी आढावा बैठक महावितरण चे कार्यकारी अभियंता दत्तात्रय साळी यांच्या बरोबर कामकाजाची आढावा बैठक घेण्यात आली होती.

शहरातील नवी सांगवी- सांगवी, काळेवाडी, वाल्हेकरवाडी या व अशा अनेक भागांत वीज खंडित होणे यासह वीज वितरण संबंधित अनेक समस्या भेडसावत आहेत. याबाबतीत नागरिक हैराण झाले असून या बाबत वारंवार तक्रारी वाढत होत्या, शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत असताना नागरिकांना लागणाऱ्या मूलभूत सुविधा पुरविणे हे स्थानिक प्रशासन यांचे काम आहे. या वाढत्या तक्रारीचे निवारण करण्याकरीता या बाबत शंकर जगताप यांनी महावितरणचे अधिकारी आणि विविध विभागातील नागरिकांचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेतली होती. या बैठकीत विविध समस्यांवर चर्चा करून त्या तत्काळ सोडवण्यासाठी निर्णय घेण्यात आला होता त्याला यश आल्याचे दिसून येत आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!