Google Ad
Editor Choice Front india

मुस्लिम बांधवांत ‘ईद अल अदा’ या सणाला बकऱ्याची कुर्बानी देण्याची धार्मिक प्रथा आहे. पण… पुढे वाचा !

महाराष्ट्र 14 न्यूज : ‘ईद अल अदा’ अर्थात बकरी ईद अगोदर गुजरात उच्च न्यायालयानं तसंच मद्रास उच्च न्यायालयानं सार्वजनिक ठिकाणी पशु हत्येवर बंदी घालण्याचे आदेश दिलेत. मुस्लिम बांधवांत ‘ईद अल अदा’ या सणाला बकऱ्याची कुर्बानी देण्याची धार्मिक प्रथा आहे. त्यामुळेच बकरी ईद हा एक प्रमुख सण आहे. ईदनंतर जवळपास दोन महिन्यांनी बकरी ईद साजरी केली जाते.

गुजरातमध्ये अहमदाबाद पोलीस आयुक्त आशिष भाटिया यांनी २५ जुलै रोजी जारी केलेल्या अधिसूचनेत केवळ सार्वजनिक ठिकाणी नाही तर जनतेला सहज नजरेस पडणाऱ्या खासगी स्थानांवरही पशु हत्या बंदीचे आदेश दिले होते. यामुळे, जनतेच्या सांप्रदायिक सद्भावनेला धक्का लागू शकतो असं यात म्हटलं गेलंय. अशाच प्रकारचे आदेश राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही जारी करण्याचे आदेश गुजरात उच्च न्यायालयानं दिलेत. इतरांच्या नजरेस पडू शकेल, अशा पद्धतीनं कुणीही बळी देऊ नये, असे आदेश गुजरात उच्च न्यायालयानं दिलेत.

Google Ad

राजकोटचा रहिवासी असलेल्या यश शाह नावाच्या एका व्यक्तीनं दाखल केलेल्या याचिकेवर (PIL) सुनावणी करताना गुजरात उच्च न्यायालयानं हे आदेश दिले. शाह यानं ३१ जुलै २०२० ते १ ऑगस्ट २०२० दरम्यान बकरी, म्हैस, मेंढी यांच्या हत्येवर पूर्णत: बंदी घालण्याची मागणी केली होती. पशु चिकित्सक अधिकाऱ्यांद्वारे सेवनासाठी अयोग्य अशा मांसावर बंदी घालण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीही याचिकाकर्त्यानं केली होती. प्रत्येक वर्षी बकरी ईदला रोड, फुटपाथ आणि सार्वजनिक ठिकाणी पशुहत्या केली जाते. त्यामुळे गंभीर आजार उद्भवू शकतात, असंही याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं.

या याचिकाकर्त्याच्या याचिकेला विरोध करताना राज्याचे अॅडव्होकेट जनरल कमल त्रिवेदी यांनी, २५ जुलै रोजी अहमदाबाद पोलीस आयुक्तांनी जारी केलेल्या अधिसूचनेत याचिकाकर्त्यांच्या चिंता अगोदरच समाविष्ट करण्यात आल्याचं सांगितलं. त्यानंतर न्यायाधीश विक्रम नाथ आणि न्यायाधीश जे बी पर्दीवाला यांनी अहमदाबाद आयुक्तांचे आदेश इतर जिल्ह्यांत जारी करण्यास सांगताना अतिरिक्त आदेश जारी करण्यास नकार दिला.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

3 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!