Google Ad
Editor Choice

Omicron मुळे महाराष्ट्राच्या मनातली धडधड वाढली … राजेश टोपे म्हणाले …

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.०३ डिसेंबर) : महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यात कर्नाटकात ओमिक्रॉन व्हरीयंटचे दोन रुग्ण आढळल्यानंतर आता महाराष्ट्र सरकारही सावध झालं आहे.

कर्नाटकमध्ये ओमायक्रोनचे दोन रुग्ण आढळ्यानंतर राज्याच्या आरोग्य विभागाने मोठी पावले उचलण्यास सुरुवात केली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. अति जोखमीच्या देशातून आलेले रुग्ण आणि त्यांच्या संपर्कातील 28 जणांच्या स्वॅबचे नमुने जिनोमिक सिक्वेन्ससाठी पाठवण्यात आल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

Google Ad

तर केंद्रसरकारही अलर्ट झाले असून परदेशातून येणाऱ्यांसाठी नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. भारतात आल्यानंतरही प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली असून त्यांना सक्तीच्या विलगीकरणाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर, कर्नाटकामध्ये आढळलेल्या दोन ओमायक्रोन रुग्ण पाहता राज्यातील जनतेने कोरोना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आणि सर्वांनी लस घेण्याचे आवाहनही राजेश टोपे यांनी केलं आहे.

त्याचबरोबर, शेजरच्या कर्नाटकमध्ये ‘ओमिक्रॉन’चे रुग्ण आढळल्यानंतर आता ओमिक्रॉन आता मुबंईतही आला असल्याची शंका उपस्थित होत आहे. याचे कारण म्हणजे 10 ते 30 नोव्हेंबर दरम्यान 2868 प्रवासी अति जोखमीच्या देशातून मुंबईत आले आहेत. यांपैकी 485 प्रवाशांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून त्यांपैकी 9 जण पॉझिटीव्ह आले आहेत. या 9 जणांची जिनोम सिक्वेसिंगची तपासणी करण्यात आली असून त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. या सगळ्यांचा जिनोम सेक्वेंसिंगचा अहवाल दोन दिवसांत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या या अहवालानंतरच त्यांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे की नाही, हे कळणार आहे.

पण, तरीही आपण सर्वांनी सतर्क राहिले पाहिजे. राज्यात तातडीने तपासणीसाठी जिनोमिक सिक्वेसिंग लॅबच्या वाढवाव्या लागतील. लसीकरणच आपल्याला ओमिक्रॉनपासून वाचवू शकते, असे तज्ज्ञांनी सांगितलं आहे. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण करून घेण्याचं आणि कोरोना प्रतिबंधांत्मक नियमांचं पालन करण्याचं आवाहनही टोपे यांनी केलं आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!