Google Ad
Editor Choice

सांगवीतील कष्टकरी भाजीवाल्या काकांकडून गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना वह्या वाटप

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि२६ ऑगस्ट) : अखिल सांगवी भाजी मंडईतील भाजीवाल्या काकांनी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष प्रशांत शितोळे यांच्या वाढदिवसानिमित्त भेट म्हणून गोळा केलेल्या वहयांचे वाटप छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे कै. सौ. शकुंतलाबाई आनंदराव शितोळे विद्यालय व नूतन माध्यमिक विद्यालय सांगवी येथील विद्यार्थ्यांना केले. गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना योग्य वेळी वहया मिळाल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. या भाजीवाल्या काकांचा अनोखा उपक्रम संपूर्ण पिंपरी चिंचवड मध्ये आदर्शवत पाहायला मिळाला.

हे सर्व भाजीवाले कष्टकरी असून स्वतः कष्ट करून आपला उदरनिर्वाह करत असताना सामाजिक दायित्वाचे भान ठेवून या सर्वांनी आपल्या कमाईतील खारीचा वाटा एकत्र करून वहया जमा केल्या व या शाळेतील 520 मुलांना प्रत्येकी अर्धा डझन वह्यांचे वाटप केले. मा. प्रशांत शितोळे यांच्यासाठी ही वाढदिवसानिमित्त अनोखी भेट होती. त्यांच्या कार्याचा सन्मान करत असताना समाजसेवकाचा वाढदिवस अशा अनोख्या उपक्रमाने या सर्व भाजीवाल्या काकांनी साजरा करून आम्हीही समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेने हा उपक्रम साजरा केला.

Google Ad

यावेळी प्रशांत शितोळे म्हणाले की खरच सांगवीतील या भाजीवाल्या काकांनी संपूर्ण पिंपरी चिंचवड मध्ये या उपक्रमाने आदर्शवत दाखवून दिला आहे.असंघटित भाजीवाले संघटित झाल्यानंतर काय होऊ शकते याचे हे आदर्श उदाहरण आहे. माझा वाढदिवस होऊन दोन महिने झाले पाऊस काळ असल्याने कार्यक्रम उशिरा झाला पण माझ्यासाठी ही अनोखी भेट आहे .मी त्यांच्या कायम ऋणात राहील. त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो असे ते म्हणाले.

यावेळी छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार रामभाऊ खोडदे, सचिव तुळशीराम नवले, शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी माने, भाजीवाले राजू प्रभू, दत्ता बिरादार, मनमत माने, गणेश वाघमारे ,पप्पू कांबळे, प्रकाश लांडगे अण्णा कराळे व सर्व सांगवी मंडईतील भाजीवाले काका, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनिता टेकवडे ,हेमलता नवले ,सीमा पाटील, भाऊसो दातीर स्वप्निल कदम ,मनीषा लाड, शीतल शितोळे, दिपाली झणझने, श्रद्धा जाधव भाग्यश्री रापटे, गायत्री कोकटे, संध्या पुरोहित, तपस्या सोमवंशी, निर्मला भोईटे, कुसुम ढमाले ,मनीषा गायकवाड यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक शिवाजी माने व आभार दत्तात्रय जगताप यांनी केले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!