Google Ad
Editor Choice Pune

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये लॉकडाऊन बाबत वेगळा निर्णय … अजित पवार

महाराष्ट्र 14 न्यूज : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन हटवण्याबाबत आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बैठकीत तत्त्वत: मान्यता देण्यात आली. त्याबाबत खात्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी घाईघाईत पत्रकार परिषद घेत घोषणा केली आणि एकच संभ्रम निर्माण झाला.

वडेट्टीवारांच्या पत्रकार परिषदेनंतर मुख्यमंत्री कार्यालयानं एक निवेदन जारी करत नवे नियम फक्त विचाराधीन असल्याचं सांगितलं. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील तोच अंतिम निर्णय असेल असं स्पष्ट केलं आहे.काही भागात शिथिलता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात वेगळ्या बातम्या आल्या त्यामुळे समज-गैरसमज निर्माण झाल्याचं अजित पवार म्हणाले.

Google Ad

राज्यातील काही भागात शिथिलता देण्याचा निर्णय घेतला आहे. दोन दिवस जाऊ देऊन सोमवारी तो जाहीर होईल. ग्रामीण भागातील रुग्णसंख्या कमी होत नसल्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये वेगळा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिलीय. त्याचबरोबर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत नियोजन सुरु आहे. म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवरील उपाचाराची बिलं भलीमोठी येत होती. पण आता सरकार रुग्णालयात या रुग्णांवर मोफत उपचार होत आहेत.

तसंच खासगी रुग्णालयांनाही दर ठरवून दिले आहेत. त्यामुळे रुग्णांना दिलासा मिळेल, असंही अजित पवार म्हणाले. त्याचबरोबर म्युकरमायकोसिसवरील इंजेक्शन्सची अजून कमतरता असल्याचंही त्यांनी सांगितलं. खडकी कॅन्टॉन्मेंट आणि पुणे कॅन्टॉन्मेंट हे पुणे शहरात धरले जात नाही. त्यामुळे पुण्याला जे नियम लागू होतात ते इथे लागू होत नाहीत. पण आता या दोन्ही कॅन्टॉन्मेंटमध्ये पुणे शहरात जे नियम लागू असतील ते लागू करण्याचे आदेस दिले असल्याची माहितीही अजित पवार यांनी दिलीय.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

16 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!