Google Ad
Editor Choice kolhapur

Dharwad : गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांवर काळाचा घाला … भीषण अपघातात ११ जण जागीच ठार!

महाराष्ट्र 14 न्यूज : पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण दुर्घटना घडली आहे. धारवाड राष्ट्रीय महामार्गावर मिनी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ११ जण जागीच ठार झाल्याचे वृत्त समोर आले आहे. तर आणखी काही प्रवासी जखमी झाले आहे. जखमींना तातडीने धारवड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी ही घटना घडली. दावणगिरीहून काही पर्यटक हे गोव्याला मिनी बसने जात होते. पहाटे धारवाड महामार्गावर मिनीबस आणि ट्रकची जोरदार धडक झाली.

हा अपघात इतका भीषण होता की, यात मिनी बसचा चुराडा झाला आहे. या अपघातात अपघातात ११ जण जागीच ठार झाले आहे. घटनास्थळावर मृत प्रवाशांचा किंचाळ्या हेलावणाऱ्या होत्या. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी प्रवाशांना तातडीने धारवाड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Google Ad

Google Ad

About the author

Maharashtra14 News

11 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!