Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांची ठेकेदाराकडून पिळवणूक … मनसेने दिला आंदोलनाचा इशारा!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका आरोग्य विभागाच्या ठेकेदाराकडे काम करणाऱ्या जुनी सांगवी, नवी सांगवी, गुरव पिंपळे येथिल महिलांचे अनेक महिन्याचे पगार तसेच कोरोना काळातील काम केलेले पैसेही ठेकेदारांमार्फत देण्यात आले नाही. कामगारानी वारंवार मागणी करूनही पैसे दिले जात नाहीत, अशा तक्रारी आल्या नंतर त्वरित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतिने नवी सांगवी साई चौक येथील आरोग्यविभागाच्या कार्यालयात जाऊन संबंधित अधिकाऱ्यांना व ठेकेदाराला विचारणा केली.

 

Google Ad

ठेकेदारांने लवकरच पगार व कोरोना काळातील १५० रुपये या प्रमाणे ६५ दिवसांचे केलेल्या कामाचे पैसेही देऊ असे आश्वासन दिले आहे. या गोष्टींची दखल न घेतल्यास मनसे कडून “ह” प्रभाग कार्यालयावर आंदोलन करणार असल्याचे राजू दत्तू सावळे पिंपरी चिंचवड शहर उपशहराध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना व सुरेश सकट यांनी यावेळी बोलताना सांगितले.

यावेळी बोलताना ‘राजू सावळे’ म्हणाले ‘ठेकेदार हे आजतागायत आम्ही अजून पाहिलेले नाहीत आणि आम्हला ते पाहयचेही नाहीत, परंतु उन्हा तान्हात कोरोनाच्या काळातही आपली व आपल्या कुटुंबाची पर्वा न करता इतरांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या या कष्टकरी गरिबांना सफाई कर्मचाऱ्यांना त्यांच्या कष्ठाच्या कामाचा मोबदला मिळाला पाहिजे, आणि त्यांना आम्ही तो मिळवून देणार हीच आमची भूमिका असणार आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

362 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!