Google Ad
Editor Choice

पिंपरी चिंचवड महानगरपपालिच्या . KIOSK द्वारे केंद्रीय पध्दतीने टोकन देण्याची व्यवस्था करण्यात आलेल्या कोविड-१९ लसीकरण ठिकाणांची यादी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि .०२.०८.२०२१) : सद्यस्थितीत पिंपरी चिंचवड महानगपालिकेमार्फत , केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसारमनपा कार्यक्षेत्रातील नागरिकांकरिता ( वयोगट – १८ ते ४४ व ४५ वर्षापुढील ) मोफत कोविङ -१९ लसीकरण अभियान राबविण्यात येत आहे . सदर मोफत कोविड १९ लसीकरणाची मोहिम मनपाच्या कार्यक्षेत्रामध्ये उपलब्ध करून देणेत आलेल्या विविध कोविड १९ लसीकरण केंद्रा मार्फत सुरु आहे . या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिका – स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत उपलब्ध करून देणेत आलेल्या KIOSK मार्फत ” प्रथम येणा – यास प्रथम प्राधान्य ” या संकल्पनेनुसार मनपाच्या एकूण आठ क्षेत्रिय कार्यालयांमधून KIOSK द्वारे वार्डनिहाय केंद्रीय पध्दतीने टोकन उपलब्ध करून देणेची व्यवस्था मंगळवार , दि .२३ जुलै २०२१ रोजीपासून कार्यान्वित करणेत आलेली आहे .

सोमवार दि .०२ / ०८ / २०२१ पासून सोबत जोडलेल्या यादीमधील ठिकाणांवर KIOSK मशीन द्वारे वार्डनिहाय केंद्रीय पध्दतीने टोकन देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे . नागरिकांनी KIOSK द्वारे वार्डनिहाय केंद्रीय पध्दतीने टोकन उपलब्ध करून घेणेकरीता आपले क्षेत्रिय कार्यालयामधील जवळच्या ठिकाणी जाऊन तेथील KIOSK मध्ये आपला मोबाईल क्रमांक , जन्म वर्ष , प्रथम अथवा द्वितीय लस , लसीचा प्रकार इत्यादी माहितीची नोंद करणे आवश्यक आहे . KIOSK मध्ये सदर माहिती नोंदविले नंतर मोबाईल क्रमांकावर उपलब्ध होणारा OTP हा KIOSK मध्ये नोंदवून नागरिक आपली माहिती या प्रणालीमध्ये समाविष्ट करू शकतात .

Google Ad

सदर नोंद झाल्यानंतर नागरिकांस KIOSK मधून छापिल टोकन व मोबाईलवर SMS द्वारे टोकन क्रमांक प्राप्त होईल . सदर पध्दतीने नागरिकांची लसीकरणासाठी संगणक प्रणालीमध्ये नोंद झालेनंतर शासनामार्फत उपलब्ध होणा – या दररोजच्या डोस संख्येनुसार या नागरिकांना लसीकरणा करिता आदले दिवशी SMS पाठविला जाईल . सदर SMS मध्ये लसीकरणाचा दिनांक , वेळ व लसीकरण केंद्राचे ठिकाण / पत्ता याबाबतची माहिती असेल . या अनुषंगानेनागरिकांनी दररोज SMS पहावा . नागरिकांनी लसीकरण केंद्रावर उपस्थित झालेवर त्यांना प्राप्त झालेला SMS आणि KIOSK द्वारे मिळालेले टोकन प्रत दाखविले नंतर ( या करिता मिळालेले टोकन नागरिकांनी जपून ठेवणे आवश्यक आहे . ) त्याबाबतची खात्री तेथे केली जाईल आणि त्यानंतर त्यांचे लसीकरण करणेत येईल .

द्वितीय डोस करिता ज्या नागरिकांचे कोविशिल्ड या लसीकरणासाठी ८४ दिवस व कोव्हॅक्सिन लसीकरणाचे २८ दिवस पुर्ण झाले असतील त्यांनाच टोकन काढता येईल . नागरिकांचे टोकननुसार लसीकरण पुर्ण झालेशिवाय संबंधित मोबाईल क्रमांक नागरिकांसमुन.श्च टोकन घेणेसाठी वापरता येणार नाही . नागरिकांचे लसीकरण पुर्ण झालेनंतर सदर मोबाईल क्रमांकहा इतर सदस्यांना टोकन घेणेकामी नागरिक वापरू शकतात . वार्डनिहाय केंद्रीय पध्दतीने लसीकरणासाठी टोकन मिळालेल्या नागरिकांना कोणत्याही कारणामुळे लसीकरणासाठी जाणे शक्य झाले नाही तर नागरिकांना पुनश्चः नव्याने टोकन घ्यावे लागेल .

नागरिकांची होणारी गैरसोय विचारात घेता व KIOSK द्वारे उपलब्ध करून देणेत येणा – या टोकन पध्दतीबाबत नागरिकांचा प्राप्त होणारा प्रतिसाद विचारात घेऊन सदर KIOSK ची संख्या वाढविण्यात येत आहे . तसेच आगामी काळामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रावर पुर्ण क्षमतेने KIOSK द्वारे वार्डनिहाय केंद्रीय टोकन पध्दतीने लसीकरण करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे . तरी महानगरपालिकेमार्फत कोविड -१ ९ लसीकरणासाठी KIOSK द्वारे उपलब्ध करून देणेत येणा – या टोकन पध्दतीचा शहरातील सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिके कडून करण्यात येतआहे .

अशा आहेत कोव्हिड १९ लसीकरण KIOSK टोकन प्रणाली मार्गदर्शक सूचना :-

🔴➖महत्वाच्या सूचना ➖

➖नागरिकांनी प्राप्त झालेले टोकन जपून ठेवावे .
➖ दररोज या अनुषंगाने एसएमएस चेक करणे .
➖वैद्यकीय विभागाकडील दररोजच्या उपलब्ध डोस संख्येनुसार नोंदणी केलेल्या नागरिकांना त्यांनी नोदविलेल्या इच्छित केंद्रानुसार केंद्रीय पद्धतीने प्रभागनिहाय संगणक प्रणालीद्वारे एसएमएस पाठविले जातील .

➖लस उपलब्ध नसल्यास किवा केंद्र बंद असेल तर तेथे नोंदणी केलेल्या नागरिकांना त्याच प्रभागामधील जवळच्या चालू लसीकरण केंद्रासाठी एसएमएस प्राप्त होईल .
➖नागरिकांना आदल्या दिवशी त्यांच्या लसीकरणाचे ठिकाण व वेळेबाबत संगणक प्रणालीद्वारे एसएमएस पाठविला जाईल .
➖लसीकरणाचा एसएमएस प्राप्त झाल्यानंतरच नागरिकांनी दिलेल्या लसीकरण केंद्रावर जावे .

➖ ज्या मोबाईल नंबर वर एसएमएस प्राप्त झालेला आहे , तो मोबाईल लसीकरण केंद्रावर सोबत घेऊन जाणे .
➖ काही कारणास्तव एसएमएस मिळालेले नागरिक हे लसीकरण केंद्रवर जाऊ न शकल्यास सदर मोबाईल क्रमांक प्रणालीतून वगळला जाईल व संबंधित नागरिकास पुन्हा नोंदणी करणे अनिवार्य राहील .
➖ लसीकरण झाल्यानंतर नागरिक सदर मोबाईल क्रमांक कुटुंबातील इतर सदस्यांच्या नोंदणीकरिता वापरू शकतात .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

5 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!