Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

नगरसेविका ‘उषाताई मुंढे’ यांची भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती मोर्च्याच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड!

महाराष्ट्र 14 न्यूज : भारतीय जनता पार्टी चे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील व विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शना खाली संघटक मंत्री विजयजी पुराणीक यांच्या सुचने नुसार , प्रदेश सरचिटनिस श्रीकांतजी भारतीय यांच्या सहकार्याने , आज अनुसूचित जमाती मोर्चा ची कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे .

भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती मोर्चा , प्रदेश अध्यक्ष प्राचार्य डॉ.अशोक उईके यांनी कार्यकारणीची घोषणा केली आहे . या निमित्ताने सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांचे अभिनंदन व पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. यामध्ये भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश अध्यक्ष प्राचार्य डॉ.अशोक उईके कार्यसमिती , उपाध्यक्ष -५ , सरचिटणीस -२ , सचिव ६ , कोषाध्यक्ष -१ , प्रसिध्दी प्रमुख -१ , सदस्य -३० , विशेष निमंत्रीत -३५ अशी निवड करण्यात आली.

Google Ad

पिंपरी चिंचवड शहर हे औद्योगिक नगरी ते स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत असताना, शहरात असणाऱ्या समाजातील सर्व थरातील कार्यकर्ते व सामान्य माणसाला न्याय देण्याचे काम भारतीय जनता पक्ष नेहमी करत आला आहे. पिंपरी चिंचवड शहारत एकहाती सत्ता मिळवून भाजपने महिला प्रतिनिधींना वेगवेगळ्या ठिकाणी प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली, अशीच संधी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे समर्थक असणाऱ्या, प्रभाग क्रमांक २९ च्या ‘नगरसेविका उषाताई अंकुश मुंढे’ यांची अनुसूचित जमाती मोर्चा महाराष्ट्र प्रदेश वर उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

उषाताईंचा एक सर्वसामान्य कार्यकर्ती ते नगरसेविका,  महिला बालकल्याण समिती सदस्य, स्थायी समिती सदस्य, जैववैविध्य समितीच्या सभापती ते आता भाजपा अनुसूचितजमाती मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड असा त्यांचा राजकिय प्रवास आहे. तळागाळातील सर्वसामान्य लोकांना बरोबर घेऊन त्यांच्या अडीअडचणी समजुन घेऊन, त्या सोडविण्यासाठी उषा मुंढे या नेहमीच आग्रही असतात.  कोरोनाच्या या संकट काळात हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब कष्टकरी समान्य नागरिकांना ‘आमदार लक्ष्मण जगताप’ यांच्या मार्गदर्शनाखाली दोन वेळा जेवण देऊन त्यांनी चांगल्या प्रकारे अन्नदानाचे महान कार्य केले. त्यांच्या या निवडींने समाजातील सामान्य माणसाला एक आधार मिळेल, हे त्यांच्या कार्यातून दिसून येते.

Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

6 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!