Google Ad
Editor Choice Maharashtra

चिंता वाढतेय : राज्यात बुधवारी एकाच दिवसात १७,४३३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद … पुण्यात रुग्णसंख्या लाखाच्या घरात!

महाराष्ट्र 14 न्यूज : राज्यात ( बुधवार 2 ऑगस्ट ) विक्रमी 17 हजार 433 नव्या करोनाबाधितांची नोंद झाली. तर दुसरीकडे आज 13 हजार 959 रुग्ण ठणठणीत होऊन घरी आले. आतापर्यंत एकूण 5 लाख 98 हजार 496 रुग्ण बरे झाले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 72.48 टक्के आहे. राज्यभरात आतापर्यंत 2 लाख 1 हजार 703 रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात कोरोना संसर्गाचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे. आज दिवसभरात 17 हजारहून अधिक लोकांना कोरोना विषाणूची लागण झाल्याची नोंद झाली. सकारात्मक बाब म्हणजे राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर आता 72.48 टक्क्यांवर पोहोचला आहे. आतापर्यंत राज्यात 42 लाख 84 हजार कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी 8 लाख 25 हजार 739 कोरोना चाचण्या सकारात्मक आल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली.

Google Ad

आज ( 2 ऑगस्ट ) राज्यात 292 मृत्यूंची नोंद
आज नोंद झालेल्या एकूण 292 मृत्यूंपैकी 201 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 55 मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित 36 मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे 36 मृत्यू नागपूर -13, जळगाव -5, पुणे -4, ठाणे -3, अहमदनगर -2, जालना -2, कोल्हापूर -2, पालघर -2, नंदूरबार- 1, रायगड -1 आणि नाशिक – 1 असे आहेत.

पुण्यात 1627 नवे रुग्ण
पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने 1 हजार 627 रुग्ण आढळले. त्यानंतर पुण्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 98 हजार 695 वर पोहचली आहे. तर आज दिवसभरात 43 रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. आतापर्यंत पुण्यात 2 हजार 375 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आज दिवसभरात करोनावर उपचार घेणार्‍यांपैकी 1 हजार 408 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आल्याची माहिती पुणे पालिकेकडून देण्यात आली.

Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

4 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!