Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व नागरिकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता पिंपरी चिंचवड मनपाने घेतले असे निर्णय, … वाचा सविस्तर

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १७ एप्रिल) : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व नागरिकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता पिंपरी चिंचवड मनपाने पुढील निर्णय घेतले आहेत, …

🔴कोविड सदृश्य रुग्णालय ( Covid Suspect Hospital )

Google Ad

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता असे लक्षात आले आहे काही व्यक्तींना कोरोना सदृश्य लक्षणे जाणवतात . परंतू , कोरोनाची टेस्ट होईपर्यंत सदरची व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह किंवा नेगेटिव्ह हे निश्चित होत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीस उपचार मिळण्यास अडचण येत आहेत . त्यासाठी पिंपरी चिंचवड मनपाने चिंचवड येथील निरामय हॉस्पिटल हे कोविड सदृश्य रुग्णालय ( Covid Suspect Hospital ) म्हणून घोषित करीत आहे . ज्यामध्ये अशे रुग्ण जावून उपचार सुरु करतील व त्यांचे रिपोर्ट आल्यानंतर पुढील उपचार पध्दती निश्चित करण्यात येईल . मनपाच्या नागरिकांसाठी सदरचा निर्णय घेण्यात येत आहे .

🔴ICU to ICU रुग्ण स्थलांतर बाबत

पिंपरी चिंचवड मनपातील कोविड हॉस्पिटल मध्ये काही रुग्ण ICU मध्ये आहेत . काही कारणास्तव सदरचे रुग्ण मनपाच्या ICU मध्ये स्थलांतरीत करतात . त्यामुळे मनपाच्या अतिदक्षता विभागावरती ताण येत आहे . तसेच सदरचा रुग्ण अत्यंत Critical Condition मध्ये असल्याने तो दगावल्यास मनपास सदर बाबत स्पष्टीकरण द्यावे लागतात , तरी सद्यस्थितीमध्ये मनपाच्या अतिदक्षता विभागामध्ये सुध्दा जागा शिल्लक नाही व जे रुग्ण मनपाच्या रुग्णालयामध्ये दाखल आहेत त्यांनाच अतिदक्षता विभागामध्ये घ्यावे लागतील . त्याची संख्या सुध्दा मोठी आहे . त्यामुळे यापुढे खाजगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील रुग्णांना मनपाच्या अतिदक्षता विभागामध्ये भरती न करुन घेण्याचा निर्णय मनपाने घेतलेला आहे .

🔴 Step Down Care Center , बालेवाडी

मनपाच्या विविध रुग्णालयांमध्ये वाय.सी.एम. , जम्बो कोबिड सेंटर , ॲटो क्लस्टर सेंटर इ . या ठिकाणी रुग्ण बरे होत आलेले असतात . परंतू , त्यांना विलगीकरणाची आवश्यकता असते अशा रुग्णांना टाप्या – टप्प्याने सामान्य परिस्थितीमध्ये आणावे लागतील अशा रुग्णांसाठी बालेवाडी येथील कोविड केअर सेंटर ( CCC ) येथे १५० बेड्सची व्यवस्था निर्माण करण्यात येत आहे . त्या ठिकाणी Step Down रुग्णांना ठेवणेत येईल अशा प्रकारची व्यवस्था मनपामार्फत करण्यात येत आहे .

🔴मनपास सहकार्य न करणाऱ्या कोविड रुग्णालयांना सक्त ताकीद दिलेबाबत

पिंपरी चिंचवड मनपामध्ये १०१ हून अधिक कोविड रुग्णालय म्हणून मनपाने मान्यता देण्यात आलेली आहे . सदर रुग्णालयांनी त्यांच्याकडील बेड्मची संख्या मनपास कळवणे आवश्यक आहे . काही ठिकाणी त्याबाबत मनपास सहकार्य केले जात नाही असे निदर्शनास आलेले आहे . त्यासाठी अशा सर्व रुग्णालयांना मा.आयुक्त यांच्या स्वाक्षरीने लेखी सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत .

यापुढे अशा रुग्णालयांनी मनपास सहकार्य न केल्यास साथ रोग अधिनियम १९८७ , आपत्ती व्यवस्था अधिनियम २००५ व महाराष्ट्र कोविड उपाययोजना २०२० अन्वये कारवाई करण्यात येईल अशी सक्त ताकीद देण्यात आलेली आहे . अशी माहिती शिरीष पोरेडी प्रवक्ता कोविड -१९ पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी दिली आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

84 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!