Google Ad
Editor Choice india

Delhi : देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा दररोज नवनवे विक्रम गाठतोय … २ लाख ३४ हजार ६९२ नवीन रुग्ण, तर १३४१ रुग्णांचा मृत्यू!

महाराष्ट्र 14 न्यूज , (दि. १७ एप्रिल) : देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा दररोज नवनवे विक्रम गाठताना दिसत आहे. गेल्या 24 तासात कोरोनाचे 2 लाख 34 हजार 692 नवीन रुग्ण भारतात आढळले आहेत. 1 लाख 23 हजार 354 जणांना डिस्चार्ज मिळाला, तर 1341 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

🔴कोरोनाग्रस्तांची आकडेवारी
गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 2 लाख 34 हजार 692 नवीन रुग्ण
गेल्या 24 तासात कोरोनामुळे 1 हजार 341 जणांचा मृत्यू
गेल्या 24 तासात 1 लाख 23 हजार 354 जणांना डिस्चार्ज देण्यात आला
एकूण कोरोना बाधित 1 कोटी 45 लाख 26 हजार 609 वर
आतापर्यंत 1 कोटी 26 लाख 71 हजार 220 जणांना देण्यात आला डिसचार्ज
देशात 16 लाख 79 हजार 740 जणांवर उपचार सुरु
आतापर्यंत कोरोनामुळे 1 लाख 75 हजार 649 जणांचा मृत्यू
आतापर्यंत देशात 11 कोटी 99 लाख 37 हजार 641 लसीकरण

Google Ad

महाराष्ट्रात काल (16 एप्रिल) 63,729 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेत. राज्यात सध्या 6 लाख 38 हजार 034 सक्रिय कोरोना रुग्ण असून, राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 37 लाख 03 हजार 584 झाली आहे. राज्यात काल 398 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील मृत्यू दर 1.61% इतका झालाय. कालच्या दिवसात 45 हजार 335 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

राज्यात आतापर्यंत एकूण 30 लाख 04 हजार 391 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 81.12 टक्के झाले आहे. सध्या राज्यात 35 लाख 14 हजार 181 जण होम क्वारांटाईन आहेत, तर 25 हजार 168 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

7 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!