Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे ‘यशवंतराव चव्हाण स्मृति रूग्णालय’ हे कोविड रुग्णांसाठी ठरतेय ‘वरदान’ … जीव धोक्यात घालून करतायेत सेवाकार्य!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१७ एप्रिल) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृति रूग्णालय हे कोविड रुग्णांसाठी वरदान ठरत आहे . सदर रूग्णालयात कोविड संशयित आणि कोविड बाधित रूग्णांसाठी सुसज्ज फिव्हर क्लिनिक ची व्यवस्था करणेत आली आहे . ताप , अंगदुखी , खोकला तथा कोरोना आजाराची इतर लक्षणे असणा – या रूग्णांना प्रथमत : येथिल फिव्हर क्लिनिक मधील डॉक्टरांमार्फत तपासले जाते .

कोविड संशयित रूग्णांना तात्काळ ऍटिजेन आणि आरटीपीसीआर तपासणी करण्याची सुविधा उपलब्ध करणेत आली आहे. यशवंतराव चव्हाण रूग्णालयाची आरटीपीसीआर प्रयोगशाळा आणि मनपाच्या यंत्रणा तत्पर कार्यरत आहेत. रूग्णालयाच्या आवरात सामाजिक कार्यकर्त्यांमार्फत संशयित तथा बाधित रूग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांचे समुपदेशन करणेकरीता स्वतंत्र कक्ष स्थापन करणेत आला आहे .

Google Ad

🔴अहोरात्र रुग्णसेवा :-

रूग्णालयात येणा – या कोविड बाधित रूग्णांसाठी अहोरात्र स्वतंत्र प्राथमिक निर्धारण कक्ष ( TRIAGE ) तयार करणेत आले आहे. या विभागात कोविड बाधित रूग्णांची तपाणी करून रूग्णांच्या लक्षणानुसार तात्काळ या विभागात उपचार केले जातात.अस्वस्थ रूग्णांना ऑक्सिजन देण्याची व्यवस्था या विभागात करणेत आली आहे.तसेच जे रूग्ण कोविड बाधित असून मात्र लक्षणे सौम्य आहेत अशा रूग्णांना गृहविलगीकरणासाठी समुपदेशन देखील केले जात आहे . रूग्णालयात सद्यस्थितीत रूग्णांची जादा गर्दी असून रूग्णालयातील सबंध कर्मचारी वर्ग , डॉक्टर्स व इतर स्टाफ रूग्णांच्या तत्पर आणि योग्य उपचारासाठी कार्यरत आहेत.

🔴आजपर्यंतचे उपचार आणि सेवाकार्य :-

रूग्णालयात कोविड संशयित १०९ आणि कोविड बाधित ५०८ रूग्ण आहेत . तसेच ऑक्सिजन बेड ३६० , आयसीयु व्हेंटिलेटर बेड ७१ उपलब्ध असून सद्यस्थितीत हे पूर्णपणे भरलेले आहेत . कोविडच्या प्रथम लाटेपासून आजपर्यंत २२७८१ अंतररूग्णांवर या रूग्णालयामार्फत यशस्वीपणे उपचार करणेत आले आहेत . त्यापैकी २१७३९ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत . या रूग्णालयामध्ये कोविड रूग्णांसाठी आवश्यक असणारी सर्व उपचार प्रणाली मोफत उपलब्ध असून गरजू रूग्णांना प्लाझ्मा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था आहे.यासाठी रक्तदान , प्लाझ्मादान आणि प्लास्मा विलगीकरणाची चोख व्यवस्था यशवंतराव चव्हाण रूग्णालय रक्तपेढीत करणेत आली आहे.यशवंतराव चव्हाण स्मृति रूग्णालयाचे सर्व डॉक्टर्स , अध्यापक आणि सर्व कर्मचारी वर्ग अत्यंत चोख आणि प्रभावीपणे कोविड रूग्णांच्या उपचारासाठी झटत आहेत .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

1,968 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!