Google Ad
Editor Choice

साफसफाई कामगारांचा ११०००/-पगारचा १६०००/- करून दिला … कर्मचाऱ्यांनी सांगवीत नातच आनंद व्यक्त केला….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१८ सप्टेंबर) : पिंपरी चिंचवड शहरातील जुनी सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव मधिल प्रभागातील सर्व कंत्राटी साफसफाई कर्मचाऱ्यांना १६००० पगार मिळवून देण्यात मनसेने घेतलेल्या भूमिकेला यश आले.

मनसे महापालिका कामगार कर्मचारी सेनेकडून कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी नवी सांगवी व जुनी सांगवी प्रभाग क्र. ३१ मध्ये दोन दिवसापूर्वी बैठक घेण्यात आली, बैठक घेवून मनसे त्यांचे प्रश्न सोडवेल, आणि गरज लागल्यास मनसेची ताकद दाखवून देवू असे आश्वासन दिले होते आणि पिंपरी चिंचवड मनपा आयुक्तांकडे या करिता पाठपुरावा केला होता.

Google Ad

कामगारांकडून आलेल्या प्रश्नांवर काम करून, आयुक्तांना निवेदन देऊन कामगारांचे पगार वाढवून घेतले. त्याबद्दल कामगारांनी सर्वांचे सत्कार घेतले व आभार मानले व आनंद व्यक्त केला. काही कर्मचाऱ्यांनी तर तेथेच आनंद व्यक्त करत गाण्याच्या तालावर डान्स ही केला, कारण त्यांच्या कष्टाचे चीज झाल्याचे त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. आता त्यांना कामाप्रमाणे दाम मिळणार होते, त्याचाच हा आनंद चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता.

यावेळेस, मनसे महापालिका कामगार कर्मचारी सेना पिंपरी-चिंचवडशहर, अध्यक्ष मा. श्री. रूपेश भाऊ पटेकर., शहर उपाध्यक्ष मा.श्री राजू (भाऊ) सावळे, महिला शहर सचिव सौ. सीमाताई बेलापुरकर, सुरेश सकट मंगेश भालेकर, निलेश नन्नवरे, भरत क्षेत्रे, दौलत आटपाडकर, पप्पु शिंदे, प्रफुल्ल कसबे, किसन हांडे, साईराज भोसले,तसेच सर्व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

75 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!