Google Ad
Editor Choice

चांदणी चौकातील जुना पूल पाडण्याची तारीख ठरली … पूल पाडण्याबाबतच्या कामाचा सविस्तर अहवाल मंंगळवारी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ सप्टेंबर) : पुण्यातील चांदणी चौकातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी जुना पूल अखेर दोन ऑक्टोबरला पाडण्यात येणार आहे. हा पूल पाडण्याचे नियोजन, त्यासाठी लागणारी यंत्रसामग्री, पूल पाडण्यासाठी लागणारा कालावधी, राडारोडा टाकण्याचे ठिकाण याबाबतचा सविस्तर अहवाल येत्या मंगळवारी (२७ सप्टेंबर) सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर पूल पाडण्यासाठी घ्यावा लागणारा ब्लॉक, पर्यायी मार्ग आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठीचे पुढील वेळापत्रक निश्चित करण्यात येईल.

विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणाच्या (पुमटा) बैठकीत चांदणी चौक येथील पूल पाडण्याविषयी सविस्तर चर्चा झाली. या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महापालिका आयुक्त विक्रमकुमार, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त राहुल महिवाल, पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.

Google Ad

या बैठकीत हा पूल दोन ऑक्टोबरला पाडण्याचे नियोजन असल्याचे महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्या दिवशी मुंबई-बेंगळुरू महामार्गावर ब्लॉक घ्यावा लागणार असून, पर्यायी मार्गांबाबतची सर्व माहिती प्रसिद्ध केली जाणार आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement