Google Ad
Editor Choice

पी डब्ल्यू डी मैदान सांगवी येथील महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागाच्या मैदानात असलेल्या शासकीय कार्यालयातच … खाजगी गोडाऊन : कोण लक्ष देईल काय ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ सप्टेंबर) : पी डब्ल्यू डी मैदान सांगवी येथील महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागाच्या मैदानात असलेल्या शासकीय कार्यालयातच खाजगी विक्रेत्यांचे सामान बेकायदेशीररित्या ठेवून गोडावून केल्याने परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. सांगवी परिसरातील पी.डब्ल्यू.डी. अर्थात सार्वजनिक विभागाच्या मैदानात असलेल्या महाराष्ट्र राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाच्या शासकीय कार्यालयात खाजगी सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असणारा तसेच येथील शासकीय कार्यालतील अधिकारी यांच्या संगनमताने शासकीय कार्यालयातच रस्त्याच्या कडेला असणाऱ्या खाजगी विक्रेत्यांचे सामान ठेवण्यासाठी परवानगी दिल्याचे दिसून आले.

येथील शासकीय इमारतीत दररोज रस्त्यावरील एक खाजगी विक्रेता रात्री उशिरा सामान कार्यालयात ठेवून पुन्हा सकाळी हे सामान लवकर बाहेर काढण्याचा प्रकार गेली अनेक महिने सुरू असल्याचे दिसून आले. नागरिकांनी याविषयी तक्रार केल्यानंतर प्रत्यक्ष ठिकाणी सकाळी सात वाजता पाहणी केली असता खाजगी सुरक्षा रक्षकाच्या परवानगीने तसेच अधिकारी यांच्या सांगण्यावरून सदर सामान ठेवले जात असल्याचे सुरक्षा रक्षकाने सांगितले. यावेळी खाजगी विक्रेता शासकीय कार्यालयात ठेवलेले समान बाहेर काढत असल्याचे दिसून आले. या ठिकाणी रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या परराज्यातील लोकांकडून पैसे घेऊन सदर शासकीय कार्यालयात साहित्य ठेवत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. जवळपास दहा ते बारा मोठमोठ्या आकाराचे साहित्य भरलेली पोती व इतर साहित्य ठेवण्यात येत असल्याचे दिसून आले.

Google Ad

शासकीय कार्यालयात अतिमहत्त्वाच्या संवेदनशील सामग्री प्रत्येक विभागात असताना येथील शासकीय कार्यालयातील अधिकारी याविषयी अनभिज्ञ कसे असा प्रश्न उपस्थित होत आहे. याठिकाणी महापालिका प्रशासनाने याअगोदरच रस्त्याच्या कडेला पदपथाला लागून भाजी व इतर खाद्यपदार्थ विक्रेत्यांना सदर मोकळ्या जागेत तात्पुरत्या स्वरूपात बसू द्यावे. असे लेखी अर्जाद्वारे पत्र येथील महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागाच्या संबंशीत अधिकाऱ्यांकडे देण्यात आले आहे. या गोष्टीचा फायदा घेऊन मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार याठिकाणी खाजगी सुरक्षा रक्षक हा स्थानिक अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून करीत असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.

एखाद्या शासकीय कार्यालयात कोणत्याही प्रकारचे सामान अथवा बाहेरील वस्तू परवानगी शिवाय ठेवता येत नाही. परंतु कोणत्याही प्रकारची भीती व काळजी न घेता अशा प्रकारे शासकीय कार्यालयाचा स्वार्थासाठी मनमानी पद्धतीने बेकायदेशीररित्या ठेवण्यात येत आहे. ही एक चिंतेची बाब म्हणावी लागेल. अशा जबाबदार अधिकारी व सुरक्षा रक्षकावर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.

———————————————-

मी सदर व्यक्तीला ओळखत नाही. तशी परवानगी दिली नाही. याबाबत माहिती घ्यावी लागेल, आधी मी याबत माहिती घेतो.
सतीश सहारे, शासकीय अधिकारी

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!