Google Ad
Editor Choice Front Maharashtra

आश्चर्यच! जुळ्या भावांना दहावीत मार्कही सेम टू सेम

महाराष्ट्र 14 न्यूज : ते दोघे जुळे भाऊ, एक अभ्यासात हुशार तर दुसरा खेळात तरबेज. दोघांचा अभ्यास वेगवेगळ्या खोलीत. परीक्षेला नंबरही पडले दोन वेगवेगळ्या शाळेत. पण दहावीचा निकाल लागला आणि काय आश्चर्य.. दोघांनाही समान गुण. कोल्हापूर शहरातील फुलेवाडी येथील प्रज्वल आणि प्रणील या दोन भावांची ही कथा. दोघांना ८९ टक्के गुण मिळाल्याने सध्या या दोघांवर कौतुकाचा वर्षाव सुरू आहे.

प्रज्वल सतीश देसाई व प्रणील देसाई हे दोघे भाऊ गुरूदेव विद्यानिकेतन या शाळेत शिकत होते. वडिल शेती तर आई घरकाम करते. यातील प्रज्वल हा अभ्यासात हुशार तर प्रणील हा खेळात पुढे. दोघेही बालवाडी पासून एकाच शाळेत आणि एकाच वर्गात शिकत होते. पण आतापर्यंत त्यांना समान गुण कधीच मिळाले नाहीत. पण दहावीच्या परीक्षेत योगायोग जुळून आला आणि दोघांच्या आनंदाला पारावर राहिला नाही.

Google Ad

मुळात हे अभ्यास करताना वेगवेगळ्या खोलीत बसायचे. दोघांचे परीक्षा केंद्रही वेगवेगळे. त्यामुळे एकमेकांचं बघून लिहलं असा कुणी म्हणू शकत नाही. दहावीमध्ये प्रज्वलला परीक्षेत ४४५ तर प्रणीलला ४४० मार्क पडले. पण कमी पडलेले पाच मार्क प्रणीलने क्रीडा नैपुण्यातून मिळवले. त्याला व्हॉलीबॉल खेळाची आवड आहे. यामध्ये त्याने मिळवलेल्या अनेक बक्षीसामुळे त्याला अतिरिक्त पाच गुण मिळाले आणि योगायोग जुळून आला. दहा जणांचं संयुक्त कुटुंब असलेल्या या घरात आनंद साजरा झाला तो फटाक्याची आतषबाजी करतच. या दोघांनाही पुढं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून मोठा अधिकारी व्हायचं आहे.

 

Tags
Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!