Google Ad
Health & Fitness Maharashtra

५००० प्लाजमा डोनर्सची यादी १५ ऑगस्टला शासनाकडे सुपूर्द करण्याचा ‘भारतीय जैन संघटनेने’ केला संकल्प!

महाराष्ट्र 14 न्यूज : गेल्या चार महिन्यात भारतीय जैन संघटनेला (बीजेएस) कोरोना संदर्भात महाराष्ट्रातील गावागावात वेगवेगळे कार्य करण्याची संधी मिळाली आहे. त्यावेळी मिळालेल्या अनुभवावरून असे दिसते की कोरोनापेक्षा कोरोनाची भीती लोकांना जास्त त्रासदायक ठरत आहे. अशा वेळी कोरोना झाल्यावर आपण त्यातून बाहेर येऊ शकतो, यावर लोकांचा विश्वास बसणे जरुरी आहे. कोरोनावर मात करून बरे होऊन आलेल्या व्यक्तीचा प्लाज्मा कोरोनाबाधित रुग्णाला मिळाल्यामुळे आपणही यशस्वीपणे बाहेर येऊ शकतो ही भावना लोकांच्यामध्ये निर्माण होणे आवश्यक आहे.

सध्याच्या परिस्थितीत प्लाज्मा डोनर्सला शोधून त्यांची प्लाज्मा देण्याची संमती घेण्याचे काम सुरु केले तर कोरोना बाधितांवर विनाविलंब ईलाज होऊन त्यांना जीवनदान मिळू शकते. यासाठी बीजेएसने संपूर्ण महाराष्ट्रात “बीजेएस प्लाज्मा डोनर्स जीवनदाता योजने” च्या माध्यमाने चळवळ उभी केली आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बीजेएसच्या कार्यकर्त्यांचे नेटवर्क आहे. त्याद्वारे प्लाज्मा दान करण्यास पात्र असणाऱ्या 5000 व्यक्तींना प्रोत्साहित करून त्यांचे संमतीपत्र मिळवून शासनाला 15 ऑगस्ट 2020 पर्यंत सुपूर्द करण्याचा निर्णय बीजेएसने घेतला आहे.

Google Ad

प्लाज्मा देण्यासाठी कोरोना आजारातून बरे होऊन दोन आठवड्यांपेक्षा जास्त अवधी झाला आहे, ज्यांचे वय 18 वर्षे पूर्ण झालेले असावे आणि ज्यांना इतर कोणतेही गंभीर आजार नाही अशा व्यक्तीच प्लाज्मा देण्यासाठी पात्र आहेत. सर्व कोरोना मधून मुक्त होऊन बाहेर पडलेल्यांनी आपला प्लाज्मा दान करून पुण्य करावे, असे आवाहन भारतीय जैन संघटने तर्फे करण्यात आले
आहे. तसेच ज्या सामाजीक संघटना या साठी काम करत आहेत त्यांनी देखील भारतीय जैन संघटना ,पिंपरी चिंचवड विभाग प्रमुख यांच्याशी संपर्क साधावा.एकत्र मिळून एक मोठे काम करता येईल असे आवाहन भारतीय जैन संघटना शहराध्यक्ष विरेश छाजेड यांनी केले आहे .
संपर्क –
विरेश छाजेड
8379055759.
शुभम कटारिया
9021575959.
नयन शहा
93264 42716
रमेशजी ओसवाल
93710 06817

Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

2 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!