Google Ad
Editor Choice Health & Fitness Maharashtra

Sangli – करोना रुग्णांवर उपचारास टाळाटाळ करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना दणका

महाराष्ट्र 14 न्यूज : करोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यास टाळाटाळ करणाऱ्या सांगलीतील टिंबर मार्केट परिसरातील मेहता हॉस्पिटलमधील तीन आरोग्य कर्मचाऱ्यांवर मेस्मा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. यात दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सुनील आंबोळे यांनी याबाबतची फिर्याद दिली. करण आवळे (रा. कर्नाळ), प्रियांका पांढरे (रा. कसबेडिग्रज) आणि मयुरी कांबळे (रा. मांजर्डे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची नावे आहेत. यापूर्वी मिरजेतील सेवासदन हॉस्पिटलमधील सहा कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढल्याने शासकीय रुग्णालयांतील खाटा अपु-या पडत आहेत. रूग्णांवर वेळेत उपचार व्हावेत यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी काही खासगी रुग्णालयांनाही करेनाबाधित रुग्णांवर उपचार करण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार सांगलीतील काही खाजगी रुग्णालयांमध्ये करोनाबाधितांवर उपचार करण्यात येत आहेत. मात्र, काही खासगी रुग्णालयांतील कर्मचारी करोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी असमर्थता दर्शवित आहेत.

Google Ad

सांगलीतील टिंबर मार्केट एरियातील मेहता हॉस्पिटल हे कोव्हिड हॉस्पिटल म्हणून कार्यान्वित करण्यात आले आहे. या रुग्णालयातील तीन कर्मचाऱ्यांनी करोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी असमर्थता दर्शविली. वारंवार सूचना देऊनही तीन कर्मचाऱ्यांनी उपचारात टाळाटाळ केल्याने या रुग्णालयाचे प्रमुख डॉ. अजीज मेहता यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे कळवले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेऊन महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांना कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सुनील आंबोळे यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी करण आवळे, प्रियांका पांढरे आणि मयुरी कांबळे यांच्या विरोधात मेस्मांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गेल्या आठवड्यात सेवा सदन हॉस्पिटलच्या नर्सिंग स्टाफवर महापालिकेने कारवाई केली होती. अशी कारवाई यापुढेही सुरू राहणार असून, जे डॉक्टर किंवा कर्मचारी हे कोव्हिड रुग्णांवर उपचार करण्यास दिरंगाई, टाळाटाळ करतील त्याच्यावर मेस्मा अंतर्गत कारवाई होणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

 

Google Ad

About the author

Maharashtra14 News

91 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!