Google Ad
Health & Fitness

“भाऊ तुम्ही लवकर बरे व्हा” … आमदार ‘लक्ष्मणभाऊ जगताप’ यांच्या प्रकृती स्वास्थासाठी कार्यकर्त्यांची विविध मंदिरात प्रार्थना!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२४ एप्रिल) : चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या उपचारासाठी आवश्यक इंजेक्शन अमेरिकेतून आणण्याची गरज होती. त्यासाठी अनेकांनी राजकारण बाजूला ठेवून विशेष प्रयत्न व पुढाकार घेतल्याची चर्चा आहे. अडचणीच्या काळात सर्व नेते पक्षभेद विसरून एकमेकांच्या मदतीसाठी धावतात, याचा अनुभव सर्वाना पहायला मिळाला. राजकारणात एकमेकांच्या विरोधात असले तरी आदर व आपुलकीच्या भावनेमुळे भाऊंवर असणाऱ्या जिव्हाळ्याचे आणि प्रेमाचे दर्शन पिंपरी-चिंचवडमध्ये घडले. त्याला कारण आहे, तो लक्ष्मण जगताप यांचा स्वभाव …

आज पिंपरी चिंचवड शहरातील अनेकांनी सहकुटुंब विविध मंदिरात जाऊन भाऊंच्या दीर्घायुष्य करीता अभिषेक करून प्रार्थना केली. यामध्ये शनिशिंगणापूर, पुसेगावचे सेवागिरी महाराज ज्या ठिकाणीआमदार लक्ष्मण जगताप हे नेहीमी जात होते. तर काहींनी भाऊंच्या निरोगी आयुष्यासाठी केलेला नवस फेडण्यासाठी चक्क पायी चालत वारी केली. तर काहींनी पाषाणच्या सोमेश्वराला साकडे घातले.

Google Ad

आज सकाळी ८ ते ९ या वेळात पिंपळे गुरव येथील नवीन प्राथमिक शाळेत लोणावळा मन:शक्ति केंद्रा तर्फे ह.भ.प.मधुकर संधान सर यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या दिर्घायुष्यासाठी व प्रकृती स्वास्थ्यासाठी गायत्री मंत्राचा जप करुन प्रार्थना करण्यात आली.तसेच भगवत गीतेतील काही श्लोकांचे पठण करण्यात आले आहे.

आमदार लक्ष्मणभाऊ जगताप याच्या दीर्घ आयुष्यसाठी हजारो कार्यकर्त्यांनी विविध प्रकारचे धार्मिक उपक्रम महाराष्ट्रातील बहुतांशी धार्मिक स्थळांमध्ये केले आहे.

गेली बारा दिवस झाले, सर्व कार्यकर्ते महिला भगिनी आपल्या लाडक्या नेत्याकरिता परमेश्वराकडे प्रार्थना करत आहेत. लक्ष्मण भाऊंचा चाहता वर्ग संपूर्ण शहरात आहे, प्रत्येकाने आपल्या लाडक्या नेत्याच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करत नेता आणि कार्यकर्त्याच्या नात्यातील निरपेक्षतेचे दर्शन घडवले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!