Google Ad
Editor Choice Health & Fitness Pimpri Chinchwad

वयाच्या सत्तरीतही शूटिंग बॉलचा प्रसार करणारे … नवी सांगवीतील ‘भाऊसाहेब जाधव’ ( कानकात्रे )

महाराष्ट्र 14 न्यूज (दि.२३एप्रिल) : वयावर काहीही अवलंबून नसते, तर आपली मानसिकता बदलली पाहिजे, याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे ‘भाऊसाहेब जाधव’ ( कानकात्रे ) पिंपरी चिंचवड शहरातील नावी सांगवीतील वय वर्ष ७० झाले असले तरीही तरुणांना लाजवेल असा-तोच जोश, तोच आनंद कायम चेहऱ्यावर असणारे ‘भाऊ’ संपूर्ण पिंपरी चिंचवड मध्ये परिचित आहेत. शूटिंग बॉल खेळात पंच , खेळाडू , प्रशिक्षक , मार्गदर्शक , संघटक व संयोजक म्हणून बहुआयामी कार्य करणारे ७० वर्षीय ‘भाऊ कानकात्रे’ या नावाने प्रसिद्ध आहेत .

Google Ad

जाधव ( कानकात्रे ) हे नवी सांगवीत राहात असून , ते राष्ट्रीय खेळाडू व पंच आहेत . आकुडींच्या बजाज ऑटो कंपनीत ते सेवेत होते . ४५ वर्षापूर्वी त्यांनी व्हॉलिबॉल खेळास सुरुवात केली . औद्योगिक क्रीडा संघटनेच्या स्पर्धेत शूटिंग बॉल खेळाचा समावेश व्हावा , यासाठी त्यांनी पाठपुरावा केला . औद्योगिक स्पर्धेत शूटिंग बॉल स्पर्धेच्या आयोजनात ते गेली ४० वर्षापासून पुढाकार घेत आहेत . तसेच विविध जिल्हा व राज्य स्पर्धेच्या आयोजनासाठी ते हिरीरिने भाग घेतात .

व्हॉलिबॉल खेळाचा नवा प्रकार म्हणून शूटिंग बॉल हा खेळ उदयास आला . या खेळाच्या शालेय स्पर्धेत सहभागी पुढकार घेणारे महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष मनोहर साळवी , उपाध्यक्ष संग्राम देशमुख यांच्या बरोबरीने त्यांनी प्रयत्न केले . आणि शालेय स्पर्धेत शूटिंग बॉलचा समावेश झाला , पहिली राष्ट्रीय शालेय शूटिंग बॉल स्पर्धा ठाणे येथे व दुसरी स्पर्धा शिरूर झाली . येथे त्यांनी पंच म्हणून काम पाहिले .

दिल्ली , मध्य प्रदेश , बुलढाणा , विदर्भ , मुंबई , कोल्हापूर , जयसिंगपूर , केरळ , नगर सह राज्यात आणि देशातील राष्ट्रीय स्पर्धेत यांनी राष्ट्रीय पंच म्हणून भूमिका बजावली . तसेच राज्य संघ निवड स्पर्धेत सलग पंचेचाळीस वर्षे पंच व सदस्य म्हणूनही ते काम पाहात आहेत . शहर तसेच ग्रामीण परिसरात शूटिंग बॉल खेळाचा प्रसार व प्रचार करण्यासाठी ते यापुढे विशेष लक्ष देत आहेत .

 

पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थी , बजाज ऑटो कंपनी व कामगार कल्याण केंद्र येथे त्यांनी प्रशिक्षक म्हणून काम पाहिले. ते पुणे जिल्हा शूटिंग बॉल संघटनेचे खजिनदार असून , सांगवीच्या अजितदादा स्पोर्ट्स क्लब व यंग नॅशनल क्लबचे पदाधिकारी आहेत . खेळाबरोबरच सामाजिक कार्याची आवड असणारे भाऊ भाजपच्या सांगवी-काळेवाडी मंडलचे चिटणीस आहेत.

क्रीडा उपक्रम व कार्यासाठी त्यांना आमदार लक्ष्मण जगताप , माजी नगरसेवक राजेंद्र राजापुरे , जिल्हा संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र गावडे , सचिव नंदकुमार भोईटे , उदय पवार , अनिल खरात , आबा गायकवाड , राज्य संघटनेचे सदस्य दत्ता पवळे , राष्ट्रीय खेळाडू सुनील पाटील , विलास भोईटे , गोपाळ पुरोहित , अशोक पुरोहित , मिलिंद भोंगरे यांचे सहकार्य लाभते .

आजही सत्तरीच्या वयात पहाटे पाच वाजता उठून चालणे, सायकल चालवणे, दोरीच्या उड्या मारणे,  पळणे, डोंगर चढणे, योगासने, दोरीच्या उड्या असा तरुणांनाही लाजवेल असा व्यायाम प्रकार अखंडपणे नथकता सुरू आहे, त्यांचा हा आदर्श तरुण पिढीने घ्यावा, आपले शरीर आणि मन प्रसन्न ठेवावे असे त्यांना नेहमी वाटते, माणसाने ‘कंटाळा’ हा शब्द काढून टाकला की त्याला आयुष्यात काहीही कमी पाडणार नाही असे ‘भाऊ’ सांगतात.

त्यांच्या या कार्यास सलाम…

 

 

Google Ad

About the author

Maharashtra14 News

103 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!