महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०५ऑगस्ट) : पिंपरी चिंचवड मनपा प्रभाग क्रमांक १६ मधिल साई नगर, राऊत नगर आणि चिंतामणी रोड, मामुर्डी या भागातील डि पी मोडकळीस आलेले, गंजलेले आहेत व ते धोकादायक आढळून आले आहेत म्हणून तातडीने आवश्यक ती कार्यवाही करावी आणि ट्रान्सफ़ार्मर च्या आजूबाजूची स्वच्छता करण्यात यावी.
त्यामुळे या परिसरात वारंवार नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत असून या पूर्वी हि बऱ्याच वेळा सब डिव्हिजन यांना फोनवर वारंवर तक्रार दिली आहे मात्र याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही तरी महावितरणने खालील मागण्यांचा तातडीने विचार करून या वर योग्य ती कार्यवाही करण्यास संबंधित अधिकाऱ्यांना कळवावे या साठी आज रावेत डिव्हिजन च्या वरिष्ठ अभियंता तळपे यांना भेटून स्नेहा गाडे भाजपच्या किवळे मंडल सरचिटणीस यांनी पत्र दिले आहे.
स्नेहा गाडे यांनी या पत्रात म्हटले आहे की, आपण याबाबत ठोस पावले उचलून संबंधित अधिकाऱ्यांना काम करण्यास प्रवृत्त केले पाहिजे. तसेच सोबत डि पी बॉक्स व ट्रान्सफ़ार्मर फोटो प्रतीही दिल्या आणि याबाबत चर्चा केली. या वेळेस उपाध्यक्ष नंदा मुन्द्रे आणि उषा गाडे उपस्थित होत्या.
9 Comments