Google Ad
Editor Choice Maharashtra Politics

पुण्याला करोनाच्या विळख्यातून बाहेर काढण्याचा प्लान तयार; झाली ‘जंबो’ बैठक!

महाराष्ट्र 14 न्यूज : पुणे शहर व जिल्ह्यातील करोनाचा प्रसार रोखण्यासाठी यापुढच्या काळात संपूर्ण यंत्रणा एकाच सेंट्रल कमांडच्या निर्देशानुसार काम करेल. कंटेन्मेंट भागात घरोघरी जावून मर्यादित कालावधीत तपासणी पूर्ण केली जाईल. रुग्णांचा शोध घेऊन त्यांचं सुरक्षित अलगीकरण, विलगीकरण केलं जाईल. करोना प्रसार रोखण्यासाठी जनजागृती करून लोकसहभाग वाढवण्यात येईल, असे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात आयोजित विशेष बैठकीत स्पष्ट केले.

विभागीय आयुक्तांसह जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांसह प्रमुख अधिकारी नियमित पत्रकार परिषद घेऊन नागरिकांशी संवाद साधतील. नागरिकांना, लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन करोनाविरुद्धची लढाई एकजुटीने लढली जाईल आणि आम्ही पुणेकर करोनाविरुद्धची ही लढाई नक्की जिंकू, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला. पुणे शहर, जिल्ह्यातील करोनाची सद्यस्थिती, उपाययोजनांसंदर्भात उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

Google Ad

विभागीय आयुक्तांसह जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांसह प्रमुख अधिकारी नियमित पत्रकार परिषद घेऊन नागरिकांशी संवाद साधतील. नागरिकांना, लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन करोनाविरुद्धची लढाई एकजुटीने लढली जाईल आणि आम्ही पुणेकर करोनाविरुद्धची ही लढाई नक्की जिंकू, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला. पुणे शहर, जिल्ह्यातील करोनाची सद्यस्थिती, उपाययोजनांसंदर्भात उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठकीत सहभागी झाले होते. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी पुणे जिल्ह्यातील कोरोनाच्या स्थिती आणि उपाययोजनांसंदर्भात माहिती सादर केली.

पुण्यात ‘करोना’च्या चाचण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आल्यामुळेच रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसत आहे. पुण्यातील स्थिती नियंत्रणात आहे. पुण्यातील करोनाचा प्रसार रोखण्याचा मुद्दा राज्य शासनाने गांभीर्याने घेतला असून जिल्ह्यातील सर्व यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागल्या आहेत. खुद्द मुख्यमंत्री दोन दिवसात पुण्याला भेट देणार असून त्यांच्या भेटीमुळे या लढाईला निश्चित बळ मिळेल असेही अजित पवार म्हणाले.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!