Google Ad
Editor Choice Food & Drinks Health & Fitness

फिट राहायचंय ? तर मग आहार आणि व्यायामाचं असं करा नियोजन !

महाराष्ट्र 14 न्यूज : नियमित व्यायाम करत असाल, तर शरीराच्या गरजा निराळ्या असतात. खर्च होणाऱ्या कॅलरी भरून काढण्यासाठी व्यवस्थित आहार घेणं गरजेचं आहे. तुम्ही नीट खाल्लं नाही, तर शरीर व्यायाम करताना साथ देणार नाही. वर्कआउट यशस्वी रीतीनं पूर्ण करण्यासाठी आपण काय खातोय याकडं लक्ष देणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कर्बोदकं आणि प्रथिनंयुक्त आहार घेतला, तरच तुम्ही पूर्ण ताकदीने व्यायाम करू शकाल. व्यायाम आणि आहारामधूनच फिटनेस राखता येतो.

व्यायाम करताना शरीर ऊर्जादायी असणं आवश्यक आहे. त्यामुळे व्यायाम करण्याअगोदर दोन-तीन तास पोटभर खाऊन घ्या. म्हणजे व्यायाम करताना शरीर क्रियाशील आणि मन उत्साही राहील. सर्व तऱ्हेची पोषणतत्त्वं असलेला आहार घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. ओट्स, चिकन सँडविच, सलाड सँडविच, पास्ता, दूध किंवा व्हीट ब्रेड हे अतिशय उत्तम पर्याय ठरू शकतात.

Google Ad

व्यायाम करण्याआधी खूप खाल्लं, तर वर्कआउट करताना आळस येऊ शकतो; पण काहीही न खाता व्यायाम केला, तरीही त्याचा हवा तो परिणाम साधता येणार नाही. व्यायाम करण्याच्या एक तास अगोदर शक्यतो काहीही खाणं टाळावं, कारण पचनक्रिया सुरू असताना व्यायाम करणं अवघड जातं. लगेचच भरल्यापोटी व्यायाम करणंही जड जातं.

कर्बोदकं आणि प्रथिनं यांचं ४:१ अशा प्रमाणात व्यायामानंतर आहार घ्यावा. खर्च झालेली ऊर्जा भरून निघण्यासाठी काही तरी खाणं अतिशय महत्त्वाचं आहे. व्यायाम केल्यानंतर ४५ मिनिटांच्या आत तुम्ही खायला हवं. ही पोषणतत्त्वं शोषून घेण्यासाठीची सर्वोत्तम वेळ असते. वर्कआउटनंतर सफरचंद, केळं आणि सुकामेवा असा पौष्टिक आहार घेण्यास प्राधान्य द्या. बिस्किटं, चॉकलेट आणि कँडी असं अर्बटसरबट खाणं टाळावं.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!