महाराष्ट्र 14 न्यूज : पुण्यात लॉकडाऊनदरम्यान पार पडलेल्या एक लग्नसोहळ्याने खळबळ माजली आहे. या लग्नसोहळ्याला आलेल्या व्यक्तींपैकी २५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे तर २ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कमीत कमी लोकांमध्ये लग्नसोहळा साजरा करण्याचं आवाहन शासन-प्रशासन करत आहे. तसंच यांसंबंधी शासनाने काही नियम देखील आखून दिले आहेत. असं असताना देखील या लग्नसोहळ्याला तब्बल २५० जणांनी उपस्थिती लावली होती.
पुणे नगर रोडवरच्या ‘हयात रिजन्सी’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये हा लग्नसोहळा पार पडला. या हॉटेलला पोलिसांनी नोटीस दिली पाठवली आहे. शिवसेनेचे उपशहर प्रमुख आनंद गोयल यांनी याविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. दरम्यान, लग्नसोहळ्यात आलेल्या २५० लोकांपैकी २५ जणांना कोरोनाची लागण झाल्याने दोन्हीकडची वऱ्हाडी मंडळी चिंतेत पडली आहे. कोरोनाची लागण झालेल्या २५ जणांच्या संपर्कात आता आणखी किती व्यक्ती आल्या आहेत, हे शोधून काढून त्यांच्या टेस्ट करणं प्रशासनासमोर आव्हान असणार आहे.
13 Comments