Google Ad
Editor Choice Maharashtra Pimpri Chinchwad

चिंता वाढतेय : पिंपरी चिंचवड शहरात आज १०२४ रुग्णांना कोरोनाचा विळखा, तर १५ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज बुधवार ( दि. १२ ऑगस्ट २०२० ) रोजी १०५२ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून पिंपरी चिंचवड शहरातील १०२४ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून शहारा बाहेरील २८ रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले असून या सर्वांवर महानगरपालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आज मृत झालेले रुग्ण भोसरी ( पुरुष ६० वर्षे , पुरुष २ ९ वर्षे ) , रहाटणी (स्त्री ७० वर्षे ) , आकुर्डी ( पुरुष ५१ वर्षे ) , थेरगाव ( स्त्री ६४ वर्षे , पुरुष ७० वर्षे , पुरुष ३२ वर्षे ) , कासारवाडी ( पुरुष ६६ वर्षे ) , मोरेवस्ती चिखली ( स्त्री ८० वर्षे ) , निगडी प्राधिकरण ( स्त्री ८९ वर्षे ) , जाधववाडी चिखली ( पुरुष ६५ वर्षे ) , नेहरुनगर पिंपरी ( स्त्री ७५ वर्षे ) , च – होली फाटा ( पुरुष ८१ वर्षे ) , चिंचवड ( पुरुष ७० वर्षे ) , काळेवाडी ( पुरुष ७२ वर्षे ) येथील रहिवासी आहेत .

Google Ad

पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे वैद्यकिय विभाग , पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त ( Extra ) मास्क जवळ बाळगावा .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

5 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!