Google Ad
Uncategorized

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह मोसमीपूर्व मुसळधार पावसाने गुरुवारी (ता.१६) अचानक तासभर धुमाकूळ घातला. सायंकाळी चार वाजता पावसाला सुरवात झाली.

पिंपरी- चिंचवड शहरातील मोशी येथे रस्त्याच्या कडेला असणारे लोखंडी होर्डिंग कोसळले आहे. मोशीत दुपारी साडेचारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह शहरातील काही भागात पाऊस झाला त्यात सोसाट्याचा वारा आल्याने हे होर्डिंग थेट कोसळलं.

Google Ad

सुदैवाने यात कुणीही जखमी किंवा जीविहितहानी झालेली नाही. मोशीतील वादळी वाऱ्याने जय गणेश साम्राज्य चौक येथील रस्त्यालगत असलेले भले मोठे लोखंडी होर्डिंग कोसळले आहे. यात चार दुचाकी आणि टेम्पोच नुकसान झाल्याचं सांगितलं जात आहे. सुदैवाने हे होर्डिंग रस्त्यावर कोसळले नसल्याने वाहतुकीला कोणतीची अडचण निर्माण झाली नाही.

  1. मागील वर्षी एप्रिल महिन्यात अशाच प्रकारचं होर्डिंग कोसळल्याची घटना घडली होती. त्यात पाच जणांचा जीव गेला होता. त्यानंतर पिंपरी-चिंचवडच्या महापालिका प्रशासनाकडून वेळोवेळी अनधिकृत होर्डिंगची माहिती घेतली जात होती. मात्र त्यावर किती कारवाई केली याची कोणतीही माहिती समोर आली नाही. त्यासोबत आता घाटकोपरमध्ये झालेल्या घटनेनंतरही पिंपरी-चिंचवड महापालिका होर्डिंगची पाहणी करत असल्याचं सांगते आहे. मात्र अनधिकृत होर्डिंगवर कारवाई होताना दिसत नाही आहे.
Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!